राम शिंदेंसाठी कर्जतमध्ये गुलालाची उधळण : भाजप कार्यकर्त्यांचा आनंदोत्सव

माजी मंत्री राम शिंदे ( Ram Shinde ) यांचे आज कर्जत तालुक्यात जोरदार स्वागत करण्यात आले.
Ram Shinde
Ram ShindeSarkarnama

कर्जत ( जि. अहमदनगर ) - विधानपरिषदेत आपला विजय मिळवून अडीच वर्षांतील आमदारपदाचा दुष्काळ मिटविणारे माजी मंत्री राम शिंदे ( Ram Shinde ) यांचे आज कर्जत तालुक्यात जोरदार स्वागत करण्यात आले. भाजप कार्यकर्त्यांनी कर्जत शहरात जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला. सिद्धटेक येथील सिद्धीविनायकच दर्शन घेत राम शिंदे कर्जत तालुक्यात दाखल झाले. तालुक्यात शिंदे यांची विविध ठिकाणी विजयी मिरवणूक काढण्यात आली. शिंदेंनी देखील सर्वसामान्य मतदारांना अभिवादन करीत धन्यवाद व्यक्त केला. ( Gulal scattering in Karjat for Ram Shinde: BJP workers celebrated )

राम शिंदे यांनी कर्जतचे ग्रामदैवत संत सद्गुरू गोदड महाराजांचे महाआरती करून दर्शन घेतले. या वेळी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे, किसान सेलचे सुनील यादव, ज्येष्ठ नेते अॅड. शिवाजीराव अनभुले, डॉ रमेश झरकर, तालुकाध्यक्ष डॉ सुनील गावडे आदी उपस्थित होते.

Ram Shinde
तीन वर्षांनंतर राम शिंदे पुन्हा आमदार : कर्जत-जामखेडच्या भाजप कार्यकर्त्यांनी केला जल्लोष

या प्रसंगी राम शिंदे म्हणाले, मागील अडीच वर्षे मतदारसंघात विकास ठप्प झाला होता. मी मंजूर करून आणलेल्या कामांचीच भूमिपूजन आणि उदघाटने होत होती. संत गोदड महाराज मंदिरात प्रवेश करताच आघाडी सरकार कोसळणार असल्याची बातमी आली. आता त्यांच्याच आशीर्वादाने आपले सरकार स्थापन होत पुन्हा एकदा आपला सर्वांगीण विकास साधण्यासाठी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली.

कर्जतमधील शासकीय विश्रामगृहाजवळून राम शिंदे यांच्या विजयी मिरवणुकीस सुरवात झाली. यावेळी महिला पदाधिकाऱ्यांसह स्थानिक नेत्यांनी डीजेच्या तालावर ठेका धरीत आपल्या अडीच वर्षांच्या वनवासाची सांगता केली. यामध्ये आमदार शिंदे ही सहभागी झाल्यानंतर मिरवणुकीत उत्साह संचारला. कोण आला रे कोण आला कर्जत जामखेडचा वाघ आला. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. राम शिंदे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है या विजयी घोषणेने महासती अक्काबाई मंदिरात दर्शन घेत विजयी मिरवणूक शहरात दाखल झाली.

Ram Shinde
खडसे, अहिर, राम शिंदे, खापरे, भारतीय यांचा विजयाचा गुलाल...

यावेळी शहरात ठिकठिकाणी आमदार शिंदेचे जोरदार स्वागत करीत पदाधिकाऱ्यांनी आपले प्रेम व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि ईदगाह मैदान याठिकाणी दोन मोठे भव्य फुलांच्या हारात राम शिंदेंना गुंफण्यात आले. शेवटी ग्रामदैवत संत श्री सदगुरु गोदड महाराजांच्या मंदिरात व श्रीराम मंदिरात दर्शन घेत महाआरती करीत विजयी मिरवणुकीची सांगता करण्यात आली. त्यानंतर राम शिंदे चौंडीकडे रवाना झाले.

Ram Shinde
रोहित पवार- राम शिंदे लढतीत सुरेश धसांचे महत्व कायम!

साठ फुटी हार, तोफांची सलामी

साठ फुटी पुष्पहार, एकवीस तोफांची सलामी, डीजे आणि हलगी पारंपरिक वाद्य, यंत्रामधून गुलालाची उधळण, प्रत्येक ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी आणि मनसोक्त नाचून आनंद जल्लोष व्यक्त करणारे पुरुष आणि महिला कार्यकर्ते हे आजच्या मिरवणुकीचे वैशिष्ट्य ठरले.

पोटरेंच्या डोळ्यात आनंदाश्रू

मिरवणुकीत जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे यांना शिंदे यांनी मिठी मारली यावेळी पोटरे यांच्या आनंदाश्रूचा बांध फुटला. त्यावेळी शिंदे यांच्याही डोळ्याच्या कडा पाणावल्या, शहराध्यक्ष गणेश क्षीरसागर यांनी शिंदे यांच्यावर गुलाब पुष्पांची उधळण केली तर किसान सेलचे सुनील यादव यांना प्रा शिंदे यांनी आपल्या गळ्यातील पुष्पहार घातला. तब्बल अडीच वर्षानंतर प्रा राम शिंदे यांची विधानपरिषदेचे आमदार म्हणून निवड झाल्यानंतर भाजपमध्ये नवसंजीवनी व कार्यकर्त्या मध्ये उत्साह संचारला होता. तब्बल तीन तासांपेक्षा जास्त ही मिरवणूक चालली त्यास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com