चंद्रकांतदादांनी संयम राखला असता तर शिवसेनेचे 56 आमदार त्यांच्या सोबत असते!

राज्यात कोरोनाचे संकट कमी झाले आहे.
चंद्रकांतदादांनी संयम राखला असता तर शिवसेनेचे 56 आमदार त्यांच्या सोबत असते!
Gulabrao Patil, Chandrakant Patilsarkarnama

पंढरपूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) सतत काहीना काही टीका करत असतात. त्याच वेळेस ते संयमाने वागले असते तर त्यांच्यासोबत शिवसेनेचे 56 आमदार दिसले असते, असा टोला पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी लगावला. पाटील यांनी आज विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी टिका न करता संयमाने राहण्याचा सल्ला दिला. (Gulabrao Patils criticism of Chandrakant Patil)

Gulabrao Patil, Chandrakant Patil
MIM ला मोठे खिंडार, जिल्हाध्यक्षांसह पाच नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

गुलाबराव पाटील पाटील म्हणाले, राज्यात कोरोनाचे संकट कमी झाले आहे. हे संकट आणखी कमी होऊ दे असे साकडे आपण विठ्ठल-रुक्मिणी चरणी घातले. राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी दहा हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. मात्र, तरीही हे पॅकेज शेतकऱ्यांना अपुरे असल्याची खंतही पाटील यांनी‌ या वेळी व्यक्त केली. जळगाव नगरपालिकेतील भाजपमधून शिवसेनेत आलेले अनेक नगरसेवक पुन्हा भाजपमध्ये निघाले आहेत. याविषयी पाटील यांना विचारले असता भाजप त्यांना अपात्रतेची भीती दाखवत असल्याचा आरोप त्यांनी केला.

Gulabrao Patil, Chandrakant Patil
चाकणकरांना शूर्पणखा म्हणालेच नाही; चित्रा वाघांचे घूमजाव

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर टीका करणे म्हणजे उंदराने काहीतरी चिंधी पकडण्यासारखे आहे, असा टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला. मंदिर समितीच्या वतीने गुलाबराब पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पंढरपूर विभागाचे शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, धनाजी काळे, सुधीर अभंगराव शहर शिवसेनेचे अध्यक्ष रवी मुळे, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता यु. बी माशाळे, शाखा अभियंता श्रीराम दामोदरे, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in