Patan News : पालकमंत्र्यांच्या 'हेमामालिनी' साखरेची गुजरातच्या व्यापाऱ्यांना भूरळ...

Balasaheb Desai लोकनेते बाळासाहेब देसाईंनी राज्याच्या मंत्रीपदावर असताना सहकारी साखर कारखाना उभा केला.
Minister Shambhuraj Desai
Minister Shambhuraj Desaisarkarnama

-अरूण गुरव

Shambhuraj Desai News : लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी दौलतनगर (मरळी) येथील ओसाड माळरानावर सहकारी कारखान्याची उभारणी करून कृषी औदयोगिक धोरणांचा पाया रचला. त्या साखर कारखान्यात‌ Sugar Factory 'एम'नावाने साखर उत्पादन‌ होते. उत्तम ग्रेडेशनचे व एकसारखी दाणेदार असल्यामुळे गुजरातमधील Gujrat व्यापारी या साखरेची चढ्या भावाने खरेदी करतात. गुजरातचे व्यापारी 'हेमामालिनी' साखर म्हणून या साखरेस ओळखतात. त्यामुळे या कारखान्याच्या टेंडरमध्ये हेमामालिनी साखरेला व्यापाऱ्यांची भुरळ पडली आहे.

लोकनेते बाळासाहेब देसाईंनी राज्याच्या मंत्रीपदावर असताना सहकारी साखर कारखाना उभा केला. त्यानंतर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष कै. शिवाजीराव देसाई यांनी कमी कालावधीत कारखाना उभारणी ते कर्जमुक्ती करून सभासदांच्या मालकीचा केला. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी ऊस ऊत्पादक शेतकरी व कर्मचारी यांचा समन्वय साधत उत्तमपणे तो चालु ठेवला.‌

कारखान्यातील साखरेस‌ व्यापाऱ्यांची वाढती मागणी व मिळणारा चढा दर पाहून महाराष्ट्रातील अनेक साखर कारखान्यांनी तसे उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला. मात्र या दर्जाचे उत्पादन आज अखेर कोणालाही करता आले नाही. महाराष्ट्रातील दिग्गज साखर कारखानदारांनी हे उत्पादन आपल्या साखर कारखान्यात तयार करण्यासाठी यासाखर कारखान्यातील केमिस्ट,चीफ इंजिनियर यांना ज्यादा पगार देऊन आपल्या कारखान्यात नोकरीस नेले.

Minister Shambhuraj Desai
Satara Politics: ...तर तुम्ही शोलेतील गब्बर सिंग! राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदेंचा आमदार शिंदेंवर पलटवार

मात्र येथे तयार होणाऱ्या गुणवत्तापूर्ण साखर त्यांना बनवण्यात यश आले नाही.सध्या अत्याधुनिक यंत्रणा असताना परंतू सेम या दर्जाची साखर इतर कोणत्याही साखर कारखान्याला उत्पादित करू शकली नाही. त्यामुळे गुजरात मधील साखरेच्या व्यापाऱ्यांना अजूनही या 'हेमामालिनी' साखरेने भुरळ घातली आहे.

Minister Shambhuraj Desai
Patan Politics : शेतकऱ्यांची ससेहोलपट रोखण्यासाठी पाटण बाजार समिती ताकतीने लढणार : शंभूराज देसाई

कारखान्याचे अध्यक्ष यशराज देसाई यांनी कारखान्याच्या आधुनिकीकरणावर करणावर भर‌ दिला आहे. येथे सन १९७० पासून साखरेचे उत्पादन केले जाते. साखर कारखान्याला फायदा जास्त कसा होईल याकडे व्यवस्थापनाचे लक्ष राहणार आहे. भविष्यात 'हेमामालिनी' साखरेच्या निर्मितीवर जास्त भर देऊन कारखान्याचा नफा कसा वाढेल याकडे कारखाना व्यवस्थापनाने लक्ष देणार आहे.

Minister Shambhuraj Desai
Eknath Shinde News : वज्रमूठ सभेला जाताना भीषण अपघात; ठाकरे गटाच्या जखमी कार्यकर्त्यांच्या मदतीला मुख्यमंत्री आले धावून

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com