'तुम्ही अगोदर खाली बसा' : दत्तात्रेय भरणे-राजेंद्र राऊतांमध्ये तू तू-मैं मैं!

पालकमंत्री भरणे आगोदर आमदार राऊत यांच्यावर दरडावले, सभा संपताना मात्र त्यांनी आमदार राऊत यांना मोलाचा कानमंत्र दिला.
'तुम्ही अगोदर खाली बसा' : दत्तात्रेय भरणे-राजेंद्र राऊतांमध्ये  तू तू-मैं मैं!
Dattatray Bharane -MLA Rajendra RautSarkarnama

सोलापूर : तुम्ही आगोदर खाली बसा, नाही बसणार खाली. मी सांगतोय ना...बसा खाली म्हणून, आमदारांना खाली बसविण्यासाठी पालकमंत्री स्वत: खुर्चीतून उठले आणि खेळीमेळीत सुरू असलेल्या जिल्ह्याच्या नियोजनात अचानकपणे तणाव आला. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आज (ता. १३ जून) पालकमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) आणि बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांच्यात घडलेला हा प्रसंग अनेकांना गंभीर करून गेला. पालकमंत्री भरणे आगोदर आमदार राऊत यांच्यावर दरडावले, सभा संपताना मात्र त्यांनी आमदार राऊत यांना मोलाचा कानमंत्र दिला. (Guardian Minister Dattatray Bharane was angry with MLA Rajendra Raut)

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाकडील रस्त्यांच्या कामाचा विषय सुरू झाला. ठेकेदारांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांपासून ते मंजूर झालेले काम सु्रू न करणाऱ्या ठेकेदारांपर्यंत विषय पुढे पुढे सरकत होता. आमदार राऊत यांना पालकमंत्री भरणे म्हणाले हा विषय काय जिल्हा नियोजन समितीचा आहे का?, आमदार राऊत यांनी प्रत्युत्तर दिले हो...जिल्हा नियोजनात रस्ता विषय येत नाही का?, हा विषय जिल्हा नियोजनाचा आहे आणि तुमच्याकडे असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाशी निगडीत आहे. आमदार राऊत यांच्या या वाक्यावर पालकमंत्री भरणे यांचा पारा चांगलाच चढला. तुम्ही आगोदर खाली बसा आणि मग विषय मांडा असे फर्मानच पालकमंत्री भरणे यांनी सोडले.

Dattatray Bharane -MLA Rajendra Raut
'ते' ठेकेदार जावई नाहीत; त्यांच्यावर तातडीने कारवाई करा : भरणे कडाडले!

आमदार राऊत यांना बसविण्यासाठी पालकमंत्री भरणे स्वत: खुर्चीतून उठून उभा राहिले. आमदार राऊत यांना खाली बसविल्यानंतरच पालकमंत्री भरणे खाली बसले. दोन्ही लोकप्रतिनिधी त्यांच्या त्यांच्या खुर्चीत बसल्यानंतर सभागृहातील वातावरण शांत झाले. थोड्या वेळाने पालकमंत्री भरणे यांनी आमदार राऊत यांना मोलाचा कानमंत्र दिला. आमदार राऊत तुम्ही चांगले प्रश्‍न मांडता पण मांडलेल्या प्रश्‍नाचे उत्तर ऐकून घेत नाहीत. आगोदर उत्तर ऐकून घ्यायला शिका, त्यानंतर तुम्ही प्रश्‍न मांडा. तुम्ही उत्तर ऐकून घेत नसल्याने समोरच्या अधिकाऱ्यांचे काम सोप्पे होत असल्याचेही पालकमंत्री भरणे यांनी सांगितले. त्यावर आमदार राऊत यांनी स्मितहास्य करून हा विषय इथेच थांबविला.

Dattatray Bharane -MLA Rajendra Raut
राष्ट्रवादीचा आणखी एक बडा नेता काँग्रेसमध्ये जाणार!

आरोप होताच काढला पदभार

जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातील विस्तार अधिकारी एच. एन. नरळे दलित वस्तीच्या कामासाठी पाच टक्क्यांप्रमाणे पैसे घेतात, नरळे यांना प्रभारी समाज कल्याण अधिकारी चंचल पाटील पाठीशी घालतात असा आरोप माळशिरसचे भाजप आमदार राम सातपुते यांनी केला. नरळे यांचा पद्भार काढण्याची मागणी आमदार सातपुते यांनी केली. पालकमंत्री भरणे यांनी या तक्रारीची तत्काळ दखल घेत नरळे यांचा पद्भभार काढण्याची सूचना सीईओ दिलीप स्वामी यांना केली. सायंकाळच्या सुमारास नरळे यांच्याकडील विस्तार अधिकारी पदाचा पदभार काढून घेण्यात आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in