पालकमंत्री आणि गृहराज्यमंत्री देसाईंनी एकमेकांची खेचली...

पालकमंत्री बाळासाहेब पाटील Balasaheb Patil यांनी आपल्या भाषणात मी जिल्ह्याचा मालक नाही परंतु मघाशी मी चेष्टेत शंभूराजे देसाई Shambhuraj desai यांना असं म्हणालो, असं कबूल केले.
Balasaheb Patil, Shambhuraj Desai
Balasaheb Patil, Shambhuraj Desaisarkarnama

सातारा : सध्या जिल्ह्यात पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांनी बोलायचं आणि त्याप्रमाणे जिल्ह्याने चालायचं असं सुरू आहे. आम्ही फक्त त्याला हो म्हणण्याचं काम करत आहे, असा मिश्किल टोला गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी पालकमंत्र्यांना लगावला. त्यावर पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी शासकिय कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती केली आहे. गृहराज्यमंत्रीही सुध्दा शासनाचा एक भाग आहेत. त्यामुळे त्यांनीही नियम पाळला पाहिजे, त्यांचे दुचाकीवरून फिरतानाचे व्हिडीओ पाहिले असून त्यांनी हेल्मेट घातले नव्हते, असे निदर्शनास आणून देत त्यांना प्रतिउत्तर दिले.

सातारा जिल्हा पोलिस दलाला मिळालेल्या नवीन वाहन आणि यंत्रसामग्रीचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री बाळासाहेब पाटील आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी दोघांनी एकमेकांवर तुफान फटकेबाजी केली. पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून सातारा पोलिस दलाला एकूण 72 संगणक, 10 वाहनांकरिता डॅशबोर्ड कॅमेरा खरेदी करण्यात आलेले आहेत.

Balasaheb Patil, Shambhuraj Desai
शंभूराज, शिवेंद्रसिंहराजे आणि उंडाळकरांना इतर नेत्यांच्या मिनतवाऱ्या कराव्या लागणार...

40 नग झेरॉक्स मशीन तर  दुचाकी 40 व चारचाकी 31 अशी एकूण 71 वाहने खरेदी करण्यात आले. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील तसेच गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, कोरेगावचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे उपस्थित होते. यावेळी बोलत असताना जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांनी जोरदार फटकेबाजी केली. पहिल्यांदा शंभूराज देसाई यांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील हे जिल्ह्याचे पालक आहेत हा जिल्हा त्यांचा आहे, असं त्यांनी आम्हाला सांगितले आणि ते आहेत.

Balasaheb Patil, Shambhuraj Desai
बाळासाहेब पाटील कराडकरांवर ठोकणार अब्रुनुकसानीचा दावा

जिल्ह्यात सध्या पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी बोलायचं आणि जिल्ह्याने चालायचं असं सुरू आहे. आम्ही फक्त त्याला हो म्हणण्याचं काम करत आहे, असा मिश्किल टोला लगावला. याला उत्तर देताना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आपल्या भाषणात मी जिल्ह्याचा मालक नाही परंतु मगाशी मी चेष्टेत शंभूराजे देसाई यांना असं म्हणालो, असं कबूल करून शेवटी जिल्ह्याची सर्व जबाबदारी माझ्यावर आहे. जिल्ह्यात काही घडलं तर त्याला दोषी पालकमंत्र्यांना धरलं जातं. शिवाय सध्या शासनाने हेल्मेट सक्ती केली आहे, याची आठवण शंभूराजे देसाई यांना त्यांनी करून दिली.

Balasaheb Patil, Shambhuraj Desai
सातारा युवक काँग्रेस : जिल्हाध्यक्षपदी अमरजित कांबळे, अमित जाधव कार्याध्यक्ष

पालकमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले जिल्हाधिकार्‍यांनी शासकीय कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती केली आहे. माझी सातारा पोलिसांना विनंती आहे गृहराज्यमंत्री सुद्धा शासनाचा एक भाग आहेत. त्यामुळे हा नियम गृहमंत्र्यांनी सुद्धा पाळला पाहिजे. मी त्यांचे व्हिडीओ पाहिले दुचाकीवरून फिरतानाचे त्यावेळी त्यांचे हेल्मेट नव्हते, अशी मिस्कील टीका पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली. या कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील दोन मंत्र्यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे एकच हशा पिकला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com