राष्ट्रवादीची वाढती ताकद दोन्ही देशमुखांसाठी ठरणार डोकेदुखी!

राष्ट्रवादीने शहरातील नव्या-जुन्या कार्यकर्त्यांचा मेळ घालत भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख आणि दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांना तगडे आव्हान देण्याचा प्रयत्न चालवला आहे.
Subhash Deshmukh-VijayKumar Deshmukh
Subhash Deshmukh-VijayKumar DeshmukhSarkarnama

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) सोलापूर (Solapur) महापालिकेवर सत्ता मिळविण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. महापालिका निवडणुकीची आखणी करताना राष्ट्रवादीने २०२४ मध्ये होणारी विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवली आहे. त्यामुळे महापालिका व्हाया विधानसभा अशीच राष्ट्रवादीची रणनीती दिसून येत आहे. राष्ट्रवादीने शहरातील नव्या-जुन्या कार्यकर्त्यांचा मेळ घालत भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख (vijaykumar Deshmukh) आणि दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) यांना तगडे आव्हान देण्याचा प्रयत्न चालवला आहे. राष्ट्रवादीतील जुन्यांसह नव्यांचे पॉलिटिकल करिअर महापालिका निवडणुकीच्या निकालावर असल्याने गटबाजीचे कारण बाजूला ठेवून ‘माझा प्रभाग, माझी जबाबदारी’ हे सर्वांना सर्वार्थाने पार पाडावी लागेल, अशी परिस्थिती आहे. (Growing strength of the NCP will be a headache for both Deshmukh's)

पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी सोलापूर शहराच्या राजकारणात लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. महाविकास आघाडी म्हणून नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून त्यांनी पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. सोलापुरात शहर उत्तर विधानसभा मतदार संघात झालेला कन्नड भवनाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम चांगलाच चर्चेत आला आहे. कार्यक्रम जरी बिगर राजकीय असला तरीही आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधकांनी या कार्यक्रमाला लावलेली हजेरी माजी महापौर महेश कोठे यांचा कॉन्फीडन्स वाढविणारी आहे. मनोहर सपाटे, नाना काळे, जनार्दन कारमपुरी, राजन जाधव, संतोष पवार, महेश गादेकर या जुन्या नेत्यांमध्ये आता महेश कोठे व आनंद चंदनशिवे या नव्या नेत्यांची भर पडणार आहे. महापालिकेच्या सत्तेसाठी राष्ट्रवादीला सर्वाधिक चांगली कामगिरी शहर उत्तर विधानसभा मतदार संघात अपेक्षित आहे.

Subhash Deshmukh-VijayKumar Deshmukh
संग्राम थोपटेंची आमदारकीपाठोपाठ ‘राजगड’च्या अध्यक्षपदाची हॅट्‌ट्रीक!

दिलीप कोल्हे, इब्राहिम कुरेशी, बिस्मिल्ला शिकलगार, सुभाष पाटणकर, जुबेर बागवान या जुन्या नेत्यांना आता तौफिक शेख यांच्यासह एमआयएममधील माजी नगरसेवकांची वाढीव ताकद मिळणार आहे. काँग्रेस व एमआयएमचा बालेकिल्ला असलेल्या या मतदार संघात राष्ट्रवादीचा सर्वाधिक कस लागण्याची शक्यता आहे. सोलापूर दक्षिणमध्ये एमआयएमच्या माजी नगरसेवकांचा व माजी आमदार दिलीप माने यांच्या ताकदीचा राष्ट्रवादीला फायदा होण्याची शक्यता आहे. तौफिक शेख यांना या भागात मानणारा वर्ग असल्याने त्याचाही फायदा राष्ट्रवादीला निश्‍चित मानला जात आहे. सोलापूर दक्षिण मतदार संघातील या शहरी भागात माजी आमदार माने यांची जादू चालल्यास २०२४ च्या विधानसभा निवडणुकीचा त्यांचा मार्ग अधिक सोपा मानला जात आहे. या शिवाय सुधीर खरटमल, ॲड. यु. एन. बेरिया यांच्या माध्यमातूनही राष्ट्रवादीला नवा मतदार या निवडणुकीत मिळणार आहे. पालकमंत्री भरणे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहरातील राष्ट्रवादीच्या मोर्चेबांधणीला येत्या काळात अधिक वेग येण्याची शक्यता आहे.

Subhash Deshmukh-VijayKumar Deshmukh
फडणवीसांनी दाखवलेला विश्वास आयुष्याच्या शेवटपर्यंत टिकवेन : सदाभाऊ खोत

राज्यसभा, विधान परिषद निवडणुकीनंतर राष्ट्रवादी उडविणार धमाका

सोलापूर शहरातील अनेक नेते राष्ट्रवादीच्या मार्गावर आहेत. या सर्व नेत्यांचा प्रवेश एकाच कार्यक्रमात घेण्या ऐवजी शहर उत्तर, शहर मध्य व सोलापूर दक्षिण या तीन विधानसभा मतदार संघातील नेत्यांच्या प्रवेशाचे तीन स्वतंत्र कार्यक्रम घेण्याचे नियोजन सुरू आहे. स्वतंत्र कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या त्या भागात वातावरण निमिर्ती केली जाणार आहे. राज्यसभा व विधानपरिषद निवडणूक झाल्यानंतर सोलापुरात राष्ट्रवादीचा प्रवेश सोहळा होण्याची शक्यता आहे.

Subhash Deshmukh-VijayKumar Deshmukh
...तर मी उमेदवारी अर्ज मागे घेतला नसता : विधान परिषदेबाबत मेटेंनी केली भूमिका स्पष्ट!

दोन्ही देशमुखांच्या प्रत्युत्तराची प्रतीक्षा

विधानसभेची २००९ ची निवडणूक हरल्यानंतर माजी महापौर महेश कोठे यांनी शहर उत्तरचा संपर्क कमी केला होता. आमदारकीच्या शोधात २०१४ व २०१९ मध्ये शहर मध्य मतदारसंघात गेलेले कोठे पुन्हा एकदा शहर उत्तरमध्ये सक्रिय झाले आहेत. आमदार विजयकुमार देशमुख यांचे या मतदार संघावर असलेले वर्चस्व आजपर्यंतच्या त्यांच्या विधानसभा निवडणुकीतील मताधिक्यावरून दिसले आहे. २०१४ व २०१९ ची लोकसभा निवडणूक आणि २०१७ च्या महापालिका निवडणुकीत हा बालेकिल्ला भाजपचाच असल्याचे उत्तर मतदारांनी दिले आहे. महापालिका निवडणुकीत सर्वाधिक लक्ष शहर उत्तरमधील भाजप व राष्ट्रवादीच्या कामगिरीवर असणार आहे. शहर उत्तरमध्ये ॲक्टिव्ह झालेल्या राष्ट्रवादीला आमदार विजयकुमार देशमुख व सोलापूर दक्षिणमध्ये ॲक्टिव्ह होत असलेल्या राष्ट्रवादीला आमदार सुभाष देशमुख कसे प्रत्युत्तर देणार? यावर पुढील राजकीय चुरस अवलंबून आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com