माणच्या पाणीप्रश्नात राज्यपालांनी घातले लक्ष; थेट जिल्हाधिकाऱ्यांनाच केला फोन...

विरळी, कुकुडवाड, शेनवडी, चिलारवाडी, पुकळेवाडी, आगासवाडी, बनगरवाडी, वरकुटे-मलवडी ही आठ गावे eight villeges in Maan taluka सतत दुष्काळाचा सामना Facing drought करीत आहेत.
Governer Bhagatsingh Koshyari
Governer Bhagatsingh Koshyari sarkarnama

दहिवडी : माण-खटाव Maan-khatav दुष्काळ हटाव समितीच्या सदस्यांनी आज टेंभू योजना Tembhu Yojana पूर्ण करुन कुकुडवाड, वरकुटे-मलवडी व पुकळेवाडी परिसराचा शेतीचा पाणीप्रश्न सोडवावा यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी Bhagatsingh Koshyari यांची भेट घेतली. या मागणीची दखल घेवून राज्यपालांनी तत्काळ जिल्हाधिकारी शेखर सिंह Shekhar Singh यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करुन योग्य ती कार्यवाही करण्याची सूचना केली.

राज्यपालांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, विरळी, कुकुडवाड, शेनवडी, चिलारवाडी, पुकळेवाडी, आगासवाडी, बनगरवाडी, वरकुटे मलवडी ही गावे सतत दुष्काळाचा सामना करीत आहेत. जमिनीचे प्रमाण मोठ्याप्रमाणावर असताना कोणतीही पाणी योजना येथे पोहोचली नाही. मंत्रालयात अनेक वेळा पाण्याची मागणी करण्यात आली. निवडणुक जवळ आली की शासन निर्णय काढले जातात, परंतू अंमलबजावणी होत नाही.

Governer Bhagatsingh Koshyari
आमदार गोरेंचे स्टार चमकणार; माण तालुक्याला लाल दिवा मिळणार

त्यामुळे वरील गावांना कायमस्वरूपी पाणी कसे देता येईल याबाबत स्वतः लक्ष घालून सरकारला आदेश द्यावेत. तसेच संबंधित विभागाकडे बैठक लावून पाणी योजना कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्यासाठी आदेश द्यावेत. या परिसराजवळून जात असलेली टेंभू योजना पुर्ण क्षमतेने कार्यान्वित करुन या संपूर्ण भागाचा पाणीप्रश्न निकाली काढावा, अशी मागणी करुन या भागाच्या पाहणी दौ-यावर यावे अशी विनंती करण्यात आली.

Governer Bhagatsingh Koshyari
मातोश्री आमचे मंदिर; तर एकनाथ शिंदे संकटमोचक : क्षीरसागरांनी साधला बॅलन्स!

या निवेदनाची तसेच चर्चेची दखल घेवून राज्यपालांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याशी दुरध्वनीवरुन चर्चा केली. तसेच पाणी योजना पूर्ण करण्यासाठी उचित कार्यवाही करण्याची सुचना केली. यावेळी चिन्मय कुलकर्णी, गणेश काटकर, प्रशांत गोरड, सचिन होनमाने, सतीश जाधव, रंगनाथ काटकर, रमेश काशीद, दादा पुकळे, संदीप नलावडे, धनश्री काटकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com