
सोलापूर : राहुरी कृषी विद्यापीठाने आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांना ‘डी. लिट’ ही मानद पदवी दिली. परंतु, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने पाठविलेल्या प्रस्तावावर राज्यपाल कार्यालयाने मागील दीड वर्षात कोणताही निर्णय घेतलेला नाही. दुसरीकडे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी डॉ. विश्वनाथ कराड (Vishwanath Karad) यांना ‘डी.लिट’ द्यावी, असे पत्र सोलापूर विद्यापीठाला पाठविले आहे, हे विशेष. (Governor Bhagatsinh Koshyari recommended to give D Lit to Dr. Vishwanath Karad)
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या तत्कालीन काही सिनेट सदस्यांनी शरद पवार यांचे कृषी, सैन्यदल, क्रीडा व राजकीय क्षेत्रात मोलाचे योगदान आहे. महिलांना आरक्षण देण्यासंदर्भात त्यांनी ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना विद्यापीठाने मानद ‘डी. लिट’ द्यावी अशी मागणी केली होती. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या दूरदृष्टीने उद्योगवाढीसाठी देशभर महामार्गांचे जाळे विस्तारले. वाहतूक गतिमान होऊन सर्वच घटकांना त्याचा मोठा लाभ होत आहे.
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावलेले लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर डी. लिट पदवी मिळावी, अशीही मागणी झाली होती. त्यानुसार विद्यापीठाने अंतिम मंजुरीसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे प्रस्ताव सादर केले होते. मात्र, दीड वर्षांहून अधिक काळ लोटला, तरी त्यावर अद्याप कोणताही निर्णय राज्यपालांनी घेतलेला नाही.
एकीकडे सोलापूर विद्यापीठाने पाठविलेल्या प्रस्तावावर कोणताही निर्णय न घेणारे राज्यपाल कोश्यारी यांनी डॉ. विश्वनाथ कराड यांना सोलापूर विद्यापीठाने मानद डी.लिट द्यावी, असे पत्र पाठविले आहे. व्यवस्थापन परिषद व सिनेटच्या मंजुरीनंतर त्याचा अहवाल राज्यपालांना सादर होईल. दुसरीकडे शरद पवार, नितीन गडकरी, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या ‘डी.लिट’ संदर्भात राज्यपाल काय भूमिका घेतात, याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे.
सिनेटच्या बहुमताअभावी डॉ. कराडांची डी. लिट लटकली
कुलपती तथा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वत: त्यांच्या स्वाक्षरीचे पत्र विद्यापीठाला पाठवले आहे. त्यात शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान देणाऱ्या डॉ. कराड यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने मानद डी. लिट द्यावी, असे म्हटले आहे. मात्र, त्यासाठी व्यवस्थापन परिषद व सिनेट सदस्यांचे बहुमत आवश्यक आहे. परंतु मंगळवारी (ता. ६ डिसेंबर) झालेल्या सिनेट बैठकीत बहुतेक सिनेट सदस्यांनी त्याला विरोध केला आहे. त्यावेळी बहुमतासाठी मतदान घ्यावे लागले. या मतदानावेळी ४८ सिनेट सदस्यांपैकी २२ जणांनी कराडांना डी. लिट द्यावी, असे मत नोंदविले, तर विरोधात तब्बल २६ जणांनी मतदान केले, त्यामुळे कराडांची डी. लिट बहुमताच्या कात्रीत अडकली आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.