राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले, शरद पवार व नितीन गडकरी दोघे ज्योतीमान तारे...

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील ( Mahatma Phule Agricultural University ) समारंभात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) यांच्या हस्ते ज्येष्ठ नेते शरद पवार ( Sharad Pawar ) व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ( Nitin Gadakari ) यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान करण्यात आली.
maharashtra governor bhagatsingh koshyasris meeting
maharashtra governor bhagatsingh koshyasris meetingSarkarnama

अहमदनगर : राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा आज 35 वा दीक्षांत समारंभ होता. या समारंभात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ज्येष्ठ नेते शरद पवार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी शरद पवार व नितीन गडकरी यांनी देशात केलेल्या कामांवर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला. Governor Bhagat Singh Koshyari said, Sharad Pawar and Nitin Gadkari are both shining stars ...

राज्यपाल कोश्यारी म्हणाले, माझ्यासाठी आज भाग्याचा दिवस आहे. कारण ज्येष्ठ नेते शरद पवार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मला पुरस्कार प्रदान करता आला. ही दोन्ही व्यक्तिमत्त्वे ज्योतीमान तारे आहेत. त्यांनी देशातील कृषी सह सर्वच क्षेत्रांत मोठे योगदान दिले आहे. दोघेही दीर्घायुषी व्हावेत. त्यांना निरोगी आयुष्य लाभावे. त्यांचे देशाला मार्गदर्शन मिळावे. त्यांनी मार्गदर्शनातून देशाची उन्नती करावी.

maharashtra governor bhagatsingh koshyasris meeting
भगतसिंह कोश्यारी म्हणाले, आयुर्वेद हा सर्वात जुना वेद...

ते पुढे म्हणाले, शरद पवार व गडकरी यांचे देशात प्रत्येक क्षेत्रात मोठे योगदान आहे. शरद पवारांनी कृषी क्षेत्राला दिलेले योगदान फार मोठे आहे. नितीन गडकरी यांच्याकडे प्रत्येक क्षेत्राकडे पाहण्याची व्यवहारी दृष्टी ही दुर्मिळ आहे. असे फार कमी लोक मिळतात. त्यामुळे न्युनगंड अथवा द्वेष न बाळगता शरद पवार व गडकरींकडे जाऊन त्यांचे मार्गदर्शन व ज्ञान घेतले पाहिजे. गडकरींकडेही दरवेळी नवीन काहीतरी जनकल्याणकारी योजना असतात. जणू काही या दोघांत चांगले काम करण्यासाठीची स्पर्धा आहे, असे वाटते. चांगल्या गोष्टी चांगल्या लोकांकडून घेतल्या जाव्यात. ही भारतीय संस्कृती आहे, असा उपदेशही राज्यपाल कोश्यारी यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com