Onion Subsidy : कांदा अनुदानासंदर्भात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे विधान; म्हणाले,‘सरकार....’

सोलापूरमध्ये जर ‘नाफेड’तर्फे कांदा खरेदी होत नसेल तर चौकशी करण्यात येईल. लगेचच त्याबाबत कार्यवाही केली जाईल
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe PatilSarkarnama

सोलापूर : कांदा (onion) अनुदान (subsidy) संदर्भात निर्णय अजून व्हायचा आहे. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनुदानसंदर्भात सांगितले आहे की, सरकार याबाबत सकारात्मक आहे. पहिल्यांदा नाफेडला कांदा खरेदी करू दे, रॅक उपलब्ध करूनही कांद्याचा उठाव झाला नाही तर मग अनुदानासंदर्भात देखील अंतिम निर्णय होईल, असे सूतोवाच महसूल मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केले. (Government positive regarding onion subsidy : Radhakrishna Vikhe Patil)

पालकमंत्री विखे पाटील हे आज (ता. ४ मार्च) सोलापूरच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी कांदा अनुदानाबाबत भाष्य केले. ते म्हणाले की, नाफेडने कांदा खरेदी केली आहे. व्यापाऱ्यांची मागणी आहे की रॅक्स उपलब्ध होत नाहीत. जादा रॅक उपलब्ध करून दिले आणि कांद्याचा उठाव झाला तरी आपोआप भाव वाढण्यास मदत होईल.

Radhakrishna Vikhe Patil
Bacchu Kadu Vs Shivsena 'गद्दारी'वरून बच्चू कडू आक्रमक : ‘हमारी खुद की पानटपरी है! कहाँ लगाना है, हम देखेंगे...’

नाफेडला कांदा खरेदीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. खरेदीच्या संदर्भात नाशिकमध्येही प्रश्न उपस्थित झाला होता. मुख्यमंत्री शिंदे यांनी पुढाकार घेत नाफेडला कांदा खरेदीच्या सूचना केलेल्या होत्या. सोलापूरमध्ये जर ‘नाफेड’तर्फे कांदा खरेदी होत नसेल तर चौकशी करण्यात येईल. लगेचच त्याबाबत कार्यवाही केली जाईल, असेही विखे यांनी स्पष्ट केले.

कांद्याच्या दरावरून महाविकास आघाडीकडून करण्यात येणाऱ्या आंदोलनाबाबत विखे पाटील म्हणाले की, शेवटी विरोधी पक्षाचे काम आहे की प्रश्नाचे राजकारण करणे. महाविकास आघाडी सरकारकडून शेतकऱ्याला कोणतीही मदत झाल्याचे आम्ही ऐकलं नाही. गारपीट, अवकाळी पाऊस या बाबतीत मागच्या सरकारने एक रुपयादेखील दिला नाही. उलट आमच्या सरकारने मर्यादा वाढवून दिल्या. ‘एनडीआरएफ’च्या निकषापेक्षा जास्त मदत देण्याचा निर्णय घेतला. राज्याच्या स्थापनेपासून हे पहिले सरकार आहे, जे शेतकऱ्यांच्या बाबतीत संवेदनशील आहे. सरकार आल्यापासून १२ हजार कोटी रूपये मागील सात महिन्यांत शेतकऱ्यांना दिले आहेत, असा दावाही पालकमंत्र्यांनी केला.

Radhakrishna Vikhe Patil
Bacchu Kadu News :आमच्यासारख्याला वाटतंय की शिवसेनेत पुन्हा गेलं पाहिजे : बच्चू कडू असं का म्हणाले?

रेडिरेकनरच्या चारपट मोबदला देणार

चेन्नई-सूरत हायवे भूसंपादनासंदर्भात आमची बैठक होणार आहे. या बैठकीत सविस्तर माहिती घेतली जाईल. रेडीरेकनरचे दर हे ठरलेले आहेत. काही ठिकाणी हे दर जास्त होते, काही ठिकाणी हे दर कमी आहेत. रेडिरेकनरच्या चारपट इतकी रक्कम आपण शेतकऱ्यांना देत असतो. हे धोरण आपण स्वीकारलेले आहे. पण, शेतकऱ्यांना वाटत असेल की त्यांना मिळणारा मोबदला हा कमी आहे, तर नक्कीच प्रशासन पातळीवर चर्चा करू आणि त्यानंतर बाधित शेतकऱ्यांशीही चर्चा केली जाईल.

Radhakrishna Vikhe Patil
Maharashtra-Karnataka Border Issue : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी मोदी सरकारचे मोठे पाऊल; 'या' सहा मंत्र्यांची नेमली कमिटी

सोलापूरच्या पाणीपुरवठ्यासंदर्भात चर्चा सुरू आहे

सोलापूरच्या पाणी पुरवठा संदर्भात महापालिका आयुक्त हे काम करत आहेत. समांतर जलवाहिनीच्या संदर्भात आमची चर्चा सुरू आहे. आमची सविस्तर चर्चा झाल्यानंतर अधिक माहिती दिली जाईल, असे उत्तर सोलापूरच्या पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com