सरकारी पक्ष मोर्चे काढतात, मग आम्हाला परवानगी का नाही? : एमआयएम

कोरोना हा आमच्याच मागे का लागलाय
सरकारी पक्ष मोर्चे काढतात, मग आम्हाला परवानगी का नाही? : एमआयएम

सोलापूर - न्यायालयाच्या आदेशानुसार मुस्लिमांनाही आरक्षण मिळावे या मागणीसाठी एमआयएम पक्षाच्या वतीने ११ डिसेंबर २०२१ रोजी मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. असी माहिती एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (imtiaz jaleel) यांनी सोलापुरात दिली. एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या उपस्थितीत आज मुस्लिम समाजाचा मेळावा पार पडला. त्यावेळी खासदार जलील यांनी मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर निशाणा साधला.

कोरोना हा आमच्याच मागे का लागलाय, असा सवाल करत त्यांनी राज्य सरकारमधील मंत्र्यांच्या सभा मेळाव्यांवर निशाणा साधला. कोरोनामुळे आमच्या मोर्चांना परवानगी नाही मिळतं, पण राज्यात ज्यांची सत्ता आहे, ज्याचा मुख्यमंत्री आहे, ते महागाईच्या मुद्द्यावर मोर्चा काढू शकतात. विना परवानगी भाजपा नागपूरात मोर्चा काढते, अजित पवार मोठमोठ्या सभा घेतात. मात्र आम्ही 27 नोव्हेंबर ला 'चलो मुंबई'चा नारा दिला, त्याला कोरोनामुळे परवानगी दिली नाही, आता 'चलो मुंबई' हा नारा नसेल आता 11 डिसेंबरला 'मुंबई तो हम आयेंगे' हा नारा असेल, अशा शब्दात इम्तियाज जलील यांनी 11 डिसेंबरच्या मोर्च्याची घोषणा केली.

सरकारी पक्ष मोर्चे काढतात, मग आम्हाला परवानगी का नाही? : एमआयएम
नवीन सरकार सत्तेत आल्याने भाजपला पोटशूळ - अब्दुल सत्तार

या मोर्च्यादरम्यान, सर्वांच्या गाड्यांवर एमआयएमचे कार्यकर्ते तिरंगा झेंडा घेऊन फडकावत मुंबईला येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे परवानगी किंवा नाही दिली तरी येत्या 11 डिसेंबरला आपण मुंबईला येणार, असल्याचे जलील यांनी स्पष्ट केले. तर अमरावती झालेल्या हिंसेच आम्ही समर्थन करणारं नाही, असंही जलील यांनी म्हटलं.

त्याचवेळी त्यांनी मुस्लिम आरक्षणाकडेही लक्ष वेधलं. शिवसेना- भाजपाचं सरकार काळात मुंबई हायकोर्टाने मुसलमानच्या शिक्षणासाठी 5% आरक्षण देण्याच्या सूचना दिल्या आहेत. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आमदार फक्त मराठा आरक्षणावर बोलतात. मराठ्यांना-धनगरांना आरक्षण द्या पण आमच्या आरक्षणावर ही बोला, असा म्हणत त्यांनी सरकारला फटकारलं आहे.

मंत्री सुनील तटकरे पार्लमेंटमध्ये फक्त मराठा आरक्षणावर बोलता. महाराष्ट्रात सत्ता आल्यानंतर त्यांनी मुस्लिम आरक्षणावर बोलणंच बंद केलं आहे. ९३ हजार एकर वक्फच्या जमिनीचं काय झालं, असा सवालही यावेळी इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला. याचवेळी त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपाच्या मुसलमनांना 11 डिसेंबरच्या मोर्च्यात मुसलमान म्हणून सामील व्हा, असे आवाहनही केले.

दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी मोर्च्याच्या माध्यमातून मोठा लढा दिला, म्हणून केंद्र सरकारला माघार घ्यावी लागली. तशीच ताकद मुसलमानाच्या प्रश्नांसाठी मुंबईत जमवावी लागणार आहे. महाराष्ट्रातून मी एकच मुसलमान खासदार असल्यामुळे मला नेतृत्व करावं लागत आहे, तुम्ही मुस्लिम खासदार निवडून द्या मी बाजूला होतो, असंही जलील यांनी यावेळी म्हटलं. अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी आज महाराष्ट्राच्या एमआयएम अध्यक्ष पदाचा राजीनामा द्या म्हणून सांगितलं तर आज देतो. मात्र मीपणा करणारा खासदार चालणार नाही.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in