Gopichand Padalkar News : गोपीचंद पडळकरांची मोठी घोषणा, शिंदे गटाच्या आमदाराची धडधड वाढली

BJP Vs Shivsena Political News : शिंदे गट आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
Gopichand Padalkar - Eknath Shinde
Gopichand Padalkar - Eknath Shinde Sarkarnama

Sangli : शरद पवारांपासून ते उध्दव ठाकरेंपर्यंत सर्वांना भिडणारे गोपीचंद पडळकर हे राज्य भाजपचा आक्रमक चेहरा म्हणून समोर आले आहेत. पण याच पडळकरांनी सत्तेत एकत्र असलेल्या शिंदे गटाच्या ताब्यात असलेल्या मतदारसंघावर दावा ठोकतानाच मोठी घोषणा केली आहे. 2024 च्या विधानसभेला खानापूर-आटपाडी मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा आमदार गोपीचंद पडळकरांनी केली आहे.

खानापूर तालुक्यातील ऐनवाडी येथे एका कार्यक्रमात आमदार गोपीचंद पडळकर यांनी मोठं विधान केलं आहे. सध्या विधान परिषदेची आमदारकी मिळविलेल्या पडळकरांना थेट जनतेतून निवडून येण्याचे वेध लागले आहे. पण याचवेळी त्यांनी खानापूर आटपाडी मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, हा मतदारसंघ शिंदे गटाच्या ताब्यात असून तिथे अनिल बाबर हे विद्यमान आमदार आहेत.

Gopichand Padalkar - Eknath Shinde
Rahul Gandhi's Mumbai Tour : मुंबईच्या ‘त्या’ दौऱ्यात काँग्रेसच्या तत्कालीन गृहराज्यमंत्र्यांनी राहुल गांधींचे जोडे उचलले होते

काही दिवसांपूर्वीच गोपीचंद पडळकर खानापूर तालुक्यातील मोही येथील एका कार्यक्रमात बोलताना 2024 साली खानापूर आटपाडी मतदारसंघात भाजप(BJP)चा उमेदवार असेल असा गौप्यस्फोट केला होता. मात्र, आता पुन्हा एकदा त्यांनी या मतदारसंघावर दावा ठोकल्याने शिंदे गट आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

पडळकर काय म्हणाले...?

आमदार गोपीचंद पडळकर(Gopichand Padalkar) म्हणाले, मी गेल्या तीन वर्षात केलेली कामं आजी-माजी आमदारांपेक्षा नक्कीच अधिक आहेत असा दावा त्यांनी केला आहे. तसेच येत्या 2024 ची निवडणूक मी लढवणार असून ती ताकदीने लढवून जिंकणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सर्वसामान्य लोकांची मागणी असल्यानं मी हा निर्णय घेत असल्याचेही त्यांनी सांगितले.

...म्हणून २०२४ ला ' ते ' निवडणूक लढवणार नाहीत!

पडळकर यांनी 2019 बाबत मोठा गौप्यस्फोट केला होता. ते म्हणाले, आपण 2019 ला बारामती मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवत होतो. त्यावेळी बारामती क्लब हाऊसला आपल्याला भेटायला अनिल बाबर (Anil Babar) आणि त्यांचे ज्येष्ठ पुत्र अमोल बाबर आले होते. आणि त्यांनी आमची ही शेवटची निवडणूक आहे.

त्यामुळे यावेळी तुम्ही आम्हाला मदत करा. २०२४ मध्ये आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो असा शब्द मला दिला होता. त्यामुळे २०२४ ला अनिल बाबर निवडणूक लढवणार नाहीत. त्यावेळी त्यांनी शब्द दिला होता आणि आमचे पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळी देखील याची नक्कीच दखल घेतील असं आमदार पडळकर यांनी स्पष्ट केलं आहे.

Gopichand Padalkar - Eknath Shinde
Rahul Gandhi's Mumbai Tour : मुंबईच्या ‘त्या’ दौऱ्यात काँग्रेसच्या तत्कालीन गृहराज्यमंत्र्यांनी राहुल गांधींचे जोडे उचलले होते

यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशामुळेच २०१९ मध्ये अनिल बाबर हे आमदार झाले असल्याचंही सांगितलं. तसेच आतापर्यंत ही गोष्टी आपण सांगितली नाही. कारण ते या गोष्टी सांगतील असं वाटलं होतं. पण ते सांगायला तयार नाहीत. यामुळे आपण मतदारसंघातील लोकांना बारामती येथील बाबर यांच्यासोबतच्या बैठकीत काय झालं हे सांगायला हवं म्हणून सांगितलं आहे असही पडळकर यावेळी म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in