अहिल्यादेवी होळकर जयंतीदिनी तुफान राडा; पडळकर-खोत यांना पोलिसांनी चौंडीजवळ रोखलं

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सवात भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे ( Ram Shinde ) व आमदार गोपीचंद पडळकर ( Gopichand Padalkar ) यांना बोलावण्यात आले नाही.
Gopichand Padalkar News in Marathi, Ahmednagar News in Marathi, Latest political News
Gopichand Padalkar News in Marathi, Ahmednagar News in Marathi, Latest political Newssarkarnama

Ahmednagar News in Marathi

अहमदनगर - चौंडी ( ता. जामखेड ) येथे आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात येत आहे. या जयंती उत्सवात भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे ( Ram Shinde ) व आमदार गोपीचंद पडळकर ( Gopichand Padalkar ) यांना बोलावण्यात आले नाही. तसेच पडळकर यांनी चौंडीतच जयंतीचा एक कार्यक्रम घेण्यासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाला परवानगी मागितली होती. ही परवानगीही नाकारण्यात आली. तरीही चौंडीत अहिल्यादेवी होळकरांचे दर्शन घेण्यासाठी निघालेल्या पडळकर व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना पोलिसांनी कर्जत तालुक्यातील चापडगाव येथे अडविले. त्यामुळे पडळकर समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. ( Gopichand Padalkar, who was on his way to Choundi, was stopped by the police )

चौंडी येथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत जयंती उत्सव होत आहे. या उत्सवाला अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, मंत्री धनंजय मुंडे, दत्तात्रेय भरणे, आमदार रोहित पवार, नीलेश लंके, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, भुषणसिंहराजे होळकर, बाळासाहेब अजबे, रामहरी रुपनर, अनिल गोटे, अक्षय शिंदे, सक्षणा सलगर आदी उपस्थित आहे. मात्र या उत्सवात अहिल्यादेवी होळकर यांच्या माहेरकडील 9 वे वंशज असलेल्या राम शिंदे यांना निमंत्रित केले नाही. तसेच गोपीचंद पडळकर यांनाही बोलावण्यात आलेले नाही. (Gopichand Padalkar News in Marathi)

Gopichand Padalkar News in Marathi, Ahmednagar News in Marathi, Latest political News
राम शिंदेंची कडी : पहाटेच अहल्यादेवींना अभिवादन

राम शिंदे यांनी पहाटेच जाऊन अहिल्यादेवी होळकरांचे स्मारक व अहिल्येश्वर देवस्थानात जाऊन पूजा केली. तसेच अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन केले. गोपीचंद पडळकर यांनी जेजुरीत जाऊन पूजा केली. तसेच तेथील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर पडळकर हे कर्जत मार्गे चौंडीच्या दिशेने निघाले होते. त्यांच्या बरोबर माजी मंत्री सदाभाऊ खोतही आहेत.

अहिल्यादेवी होळकर यांचे दर्शन घेण्यासाठी निघालो असल्याचे त्यांचे म्हणणे होते. मात्र पोलिसांनी त्यांना चापडगाव ( ता. कर्जत ) येथे अडविले. त्यामुळे त्यांच्या बरोबर असलेल्या समर्थकांनी महाविकास आघाडी विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली असून पडळकर समर्थक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com