गोपीचंद पडळकर म्हणाले, आता आमच्या हातात ट्विटर अन् सोशल मीडिया आलाय!

आमदार गोपीचंद पडळकर ( Gopichand Padalkar ) यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार, आमदार रोहित पवार व महाविकास आघाडीवर टीका केली.
Gopichand Padalkar
Gopichand Padalkar Sarkarnama

जामखेड ( जि. अहमदनगर ) - चौंडी (ता. जामखेड) येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवीच्या 297 व्या जयंतीसाठी येत असलेल्या भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना पोलिसांनी चापडगाव येथे अडवले. त्यांना आमदार रोहित पवार व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत होत असलेल्या जयंती उत्सवाचा कार्यक्रम संपेपर्यंत जाण्यास मज्जाव केला. हा कार्यक्रम संपल्यानंतर आमदार पडळकर कार्यकर्त्यांसह चौंडीत दाखल होताच चौंडीतील रस्त्याला सभेचे रूप आले. यावेळी बोलताना गोपीचंद पडळकर ( Gopichand Padalkar ) यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार, आमदार रोहित पवार व महाविकास आघाडीवर टीका केली. ( Gopichand Padalkar said, Sharad Pawar cheated his grandfather-great grandfather ... )

गोपीचंद पडळकर म्हणाले, खासदार शरद पवारांना चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, केंद्रात मंत्री असताना त्यांना अहिल्यादेवी आणि चौंडी नाही आठवली. शरद पवार आता आपल्याला फसवायला आले आहेत. मात्र ते आम्हाला फसवू शकत नाहीत. कारण आमच्या हातात 'ट्विटर' आलंय सोशल मीडिया आलाय; आम्ही त्यांची भूमिका आणि दृष्टिकोन ओळखून आहोत.

Gopichand Padalkar
Video : 'गोपीचंद पडळकर यांच्याकडून 'चौंडी' येथे घाणेरडे राजकारण'

ते पुढे म्हणाले की, "मला चौंडी येथे येताना चापडगाव या ठिकाणी प्रशासनाने आडविले; मला सरकारला सांगायचंय, माझा बाप मेंढरामागं दिवसाला 35 किलोमीटर चालतो. त्यामुळे तुम्ही आम्हाला किती अडवलं तरी तुम्ही आम्हाला येथे येण्यापासून रोखू शकत नाहीत. आमचा संघर्ष जातिवाद्यांशी आहे. आज मी मल्हारी मार्तंडाचे दर्शन घेऊन चौंडीत पोहचलो. अहिल्यादेवीच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घातला. मी येथे येण्यापूर्वी अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याला चुकीच्या व्यक्तींचे हात लागून झालेली विटंबना मी दुग्धाभिषेक करून धुवून काढली, असे त्यांनी सांगितले.

यावर्षी जयंतीच्या निमित्ताने झालेला प्रकार आपण पाहिलात मात्र पुढच्या वर्षीची जयंती कशी साजरी करायची? हे आपण ठरविणार आहोत. येथे अहिल्यादेवी होळकर यांचा आणि त्यांच्या वारसांचा फोटो चालेल मात्र इतर कोणाचेही फोटो चालणार नाहीत. अहिल्यादेवींची जयंती साजरी करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. आम्ही मेंढरांची लोकर विकली तरी भव्यदिव्य जयंती उत्सव आम्ही साजरा करू शकतो. आम्हाला कोणाच्या मदतीची गरज नाही, असे ही त्यांनी स्पष्ट केले.

Gopichand Padalkar
video : गोपीचंद पडळकर- राम शिंदे यांचे चौंडी येथे शक्तीप्रदर्शन

राम शिंदे म्हणाले," शासन प्रशासन आणि पोलीसांच्या गोंधळामुळे जयंती उत्सवाचा हा प्रकार घडला. यावर्षी शरद पवार आणि रोहित पवार यांनी हा जयंती 'हायजॅक' करण्याचा प्रयत्न केला. आम्ही सुसंस्कृत, संयमी आहोत. तुम्ही आमची परीक्षा पाहू नका. पवार येथे केवळ जयंतीच साजरी करायला आले नाहीत तर चौंडीतील ग्रामपंचायतीची 80 एकर जमीन हडप करायला आले आहेत. नातवाची काळजी म्हणून आजोबा या ठिकाणी आलेत. यावर्षीचे सोडा पुढच्या वर्षीची आहिल्यादेवीची जयंती कशी होणार हे आम्हीच ठरविणार," असे त्यांनी सांगितले.

माजी मंत्री खोत यांनी सांगितले की," काका-पुतणे एवढे हुशार आहेत आम्हाला रस्त्यात थांबवलं. आणि इकडे राम शिंदे यांना ही जयंतीला बोलावले नाही. चौंडी म्हणजे काय तुमचा सातबारा वाटला काय ? येथे काही हडप करायला तर आला नाहीत ना ? तुम्ही आजपर्यंत काय केलंय कारखाने हडपले, सुतगिरण्या हडपल्या," असा आरोपही त्यांनी पवार कुटुंबीयांवर केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com