आटपाडी राडा : आमदार पडळकर अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात!

सांगली जिल्हा बॅंकेच्या (Sangli District Bank) निमित्ताने मोठा गदारोळ आटपाडी तालुक्यात झाला होता.
आटपाडी राडा : आमदार पडळकर अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात!
Gopichand Padalkar Sarkarnama

सांगली : आटपाडी येथे राडा केल्‍याप्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तानाजी पाटील यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळल्यानंतर पडळकर यांनी आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

त्यांच्या या अर्जावर 23 नोव्हेंबर रोजी अर्जावर सुनावणी होणार आहेत. दरम्यान, याप्रकरणाचा हा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण स्वतंत्रपणे करत आहे. गेल्या आठवड्याभरापासून एलसीबीचे पथक आटपाडीत तळ ठोकून आहे. राडा प्रकरणातील संशयितांची धरपकड सुरू आहे.

Gopichand Padalkar
खोत, पडळकर चिडले : परब तुम्ही स्मशानात जा आणि...

सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या वेळी आटपाडीत हा राडा झाला होता. थेट पडळकर यांना लक्ष्य करत आमदारांनी अंगावर गाडी घालून ठार करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप राजू जानकर यांनी करून खळबळ उडवून दिली होती. त्यांच्या या आरोपानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी पडळकरांच्या गाडीवर दगडफेक करीत तोडफोड केली. त्यानंतर परस्परविरोधी फिर्यादी दिल्या.

पडळकर हे एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सक्रियपुणे पुढे आहेत. उच्च न्यायालायने जामीन फेटाळल्यानंतर पोलिस त्यांना आंदोलन स्थळापासूनच अटक करतील का, याची शंका व्यक्त होत आहे. त्यामुळे पोलिसांनीही योग्य ती खबरदारी घेऊन कारवाई करण्याचे निश्चित केले आहे.

Gopichand Padalkar
आटपाडी राडा प्रकरण : गोपीचंद पडळकरांचा अटकपूर्व जामीन फेटाळला..

या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषणकडे सोपविण्यात आला आहे. त्यांच्याकडून आटपाडी तालुक्यात छापेमारी करण्यात आली. आमदार पडळकर, तानाजी पाटील, ‘राष्ट्रवादी’चे राजू जानकर यांची आलिशान चार वाहने जप्त केली. त्यानंतर पडळकर यांच्यासह तानाजी पाटील यांनी अटकपूर्वसाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली. तो अर्ज न्यायालयाने फेटाळला. आता पडळकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उद्या सुनावणी होणार आहे. दरम्यान, सांगलीतील पथक मुंबईत दाखल झाल्याचे समजते आहे.

दरम्यान, गुन्ह्यातील संशयितांच्या शोधासाठी पथके करून धरपडक मोहीम करण्यात आली. ‘एलसीबी’चे निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्यासह सहायक निरीक्षक निरज उबाळे, प्रशांत निशाणदार, उपनिरीक्षक महंमद रफीक शेख, विशाल येळेकर, दिलीप ढेरे, महादेव नागणे, सचिन कनप, मच्छिंद्र बर्डे, जितेंद्र जाधव, संदीप गुरव यांच्या पथकाचा समावेश आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in