राज्यातील बेरोजगार युवकांसाठी आनंदाची बातमी : मोठी पोलिस भरती होणार

राज्यातील पोलिसांवर कामाचा ताण कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
राज्यातील बेरोजगार युवकांसाठी आनंदाची बातमी : मोठी पोलिस भरती होणार
policesarkarnama

पुणे - राज्यातील पोलिसांवर कामाचा ताण कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यादृष्टीने राज्यात मागील दोन-तीन वर्षांतील सर्वांत मोठी पोलिस भरती होणार आहे. त्यामुळे राज्यातील बेरोजगार व होतकरू युवकांसाठी सरकारी नोकरी मिळविण्याची मोठी संधी आली आहे. ( Good news for unemployed youth in the state: There will be big police recruitment )

राज्यात पुढील दोन महिन्यांत सात हजार पोलिसांची नवी भरती होणार आहे. त्यानंतर काही महिन्यांनी सहा हजार पोलिसांची भरती होईल. अशा दोन टप्प्यांत पोलिस कॉन्स्टेबल पदासाठी राज्यात एकाच वेळी भरती होणार आहे. महाराष्ट्रात पोलिसांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे पोलिसांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे. हा ताण-तणाव कमी करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. पुढच्या दोन महिन्यांत महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यात पोलिस कॉन्स्टेबल पदासाठी भरती केली जाणार आहे.

police
नागपूरच्या पोलिस आयुक्तांनी शोधून काढलाय पारदर्शक बदल्यांचा नवा पॅटर्न

ही भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबविली जाणार आहे. त्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. नागपूरमध्ये राबविण्यात आलेल्या भरती प्रक्रियेच्या धरतीवर ही प्रक्रिया राबविली जात आहे. राज्यातील मागील भरती प्रक्रियेवर टीका झाली होती. त्यामुळे ही भरतील प्रक्रिया अधिक पारदर्शकपणे राबविली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in