'ग्लोबल टीचर' डिसले गुरुजी अडचणीत ; शिस्तभंगाची कारवाई ?

डिसले गुरुजींवर कारवाई झालीच तर त्यांच फुलब्राईट शिष्यवृत्तीसाठी अमेरिकेत जाण्याच स्वप्न पूर्ण होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Ranjitsinh Disale News, Disale Guruji News, Global Teacher Disale Guruji News
Ranjitsinh Disale News, Disale Guruji News, Global Teacher Disale Guruji Newssarkarnama

सोलापूर : 'ग्लोबल टीचर' रणजितसिंह डिसले (Global Teacher Ranjitsinh Disale)यांच्या अडचणीत वाढ होत आहे. त्यांच्याबाबतचा अहवाल शिक्षणाधिकाऱ्यांनी सीईओंकडे दिला आहे. त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल का, अशी चर्चा सुरु आहे.

ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले यांनी ग्लोबल पुरस्कारासाठी अर्ज करताना कोणत्याही अधिकाऱ्यांची परवानगी घेतली नाही, जिल्हा प्रशिक्षण संस्थेकडे (डायट) नियुक्‍ती असतानाही तेथे गैरहजर राहिल्याचा ठपका त्यांच्यावर आहे. या पार्श्‍वभूमीवर सुरवातीला त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई होईल. त्यानंतर गैरहजर काळातील जवळपास ३४ महिन्यांचे वेतन वसूल केले जाईल, अशी शक्यता आहे. (Ranjitsinh Disale Guruji News)

''तत्पूर्वी तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी नियुक्‍त केलेल्या चौकशी समितीच्या अहवालातील बाबींची पडताळणी होईल,'' असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितलय.जागतिक स्तरावरील ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह अनेकांनी डिसले गुरुजींचा सन्मान केला होता.

Ranjitsinh Disale News, Disale Guruji News, Global Teacher Disale Guruji News
जम्मू-काश्मीरमध्ये कॉग्रेसला मोठा धक्का ; महाराजा हरि सिंह यांच्या नातूचा राजीनामा

फुलब्राईट शिष्यवृत्तीसाठी अमेरिकेत जाण्यासाठी केलेल्या रजेच्या अर्जानंतर ग्लोबल टीचर चर्चेत आले. त्यानंतर डिसले गुरुजींनी ग्लोबल पुरस्कारासाठी नेमक्‍या कोणत्या बाबींची माहिती संबंधित संस्थेला दिली होती, त्याची पडताळणी झाली. त्यामुळे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आलेल्या डिसले गुरुजींवर कारवाई झालीच तर त्यांच फुलब्राईट शिष्यवृत्तीसाठी अमेरिकेत जाण्याच स्वप्न पूर्ण होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

परितेवाडी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत सहशिक्षक असताना डिसले यांना तंत्रस्नेही विशेष शिक्षक म्हणून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत (डाएट) प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले होते. परंतु तेथे ते सलग तीन वर्षे गैरहजर राहिले. तसा अहवाल जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेकडून जि. प. प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयास प्राप्त झाला होता. त्याचवेळी तीन वर्षे गैरहजर असूनही डिसले यांना पगार करण्यात आल्याची बाब समोर आली होती. त्यामुळे शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी परितेवाडी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक कदम यांना नोटिस बजावून डिसले यांचा पगार कसा काढण्यात आला, अशी विचारणा केली आहे.

Ranjitsinh Disale News, Disale Guruji News, Global Teacher Disale Guruji News
Prajwala Scam:भाजपला झटका ; ठाकरे सरकार करणार विजया रहाटकरांची चैाकशी

डिसले यांनी तीन वर्षे सेवेत गैरहजर असतानाही त्या कालावधीत घेतलेला पगार त्यांच्याकडून वसूल करावा, अशी मागणी सोलापूर प्रदेश शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य सुभाष माने यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com