राजीनामा देण्याच्या तयारीत असलेले डिसले गुरुजी दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह

ग्लोबल टिचर पुरस्काराने डिसले गुरुजींचा जागतिक पातळीवर गौरव झाला होता.
Ranjitsinh Disale
Ranjitsinh Disale Sarkarnama

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील परितेवाडी शाळेची ज्या रणजितसिंह डिसले (Ranjitsinh Disale) गुरुजीमुळे जगाला ओळख झाली, ते येत्या दोन ते तीन दिवसांत राजीनामा देणार आहेत. ग्लोबल टिचर पुरस्काराने डिसले गुरुजींचा जागतिक पातळीवर गौरव झाला होता. आता डिसले गुरुजी कोरोना (Covid-19) पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांना दुसऱ्यांदा कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

डिसले गुरुजींना सौम्य लक्षणे जाणवत होती. त्यामुळे त्यांनी कोरोना चाचणी करुन घेतली. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ते घरीच विलगीकरणात उपचार घेत आहेत. दरम्यान, डिसले गुरुजींनी अमेरिकेत पीएचडी (PHD) करण्यासाठी सोलापूर शिक्षण विभागाकडे 6 महिन्यांची रजा मागितली होती, त्याला सोलापूर जिल्हा परिषद शिक्षाण विभागाकडून त्रुटी आहेत, असे सांगून नकार देण्यात आला होता. यावर ज्या व्यवस्थेमध्ये आपल्या कामाचा आदर केला जातं नाही, अशा ठिकाणी काम करण्याच्या मानसिकतेमध्ये मी सध्या नाही, अशी भावना डिसले गुरुजींनी व्यक्त केली होती.

डिसले गुरूजी म्हणाले होते की, काम करण्यासाठी एक विश्वासाचं वातावरण असावं लागतं. मात्र, कामाची दखल न घेता अपमानास्पद वागणूक मिळत आहे. यामुळे माझ्या संयमालासुद्धा मर्यादा आहेत. आपल्या कामाचा आदर केला जात नाही त्या ठिकाणी मी काम करण्याच्या मानसिकतेमध्ये मी नाही. मला अमेरिकेत पीएचडी करण्यासाठी जायचे आहे. त्यासाठी सोलापूर शिक्षण विभागाकडे 6 महिन्यांच्या रजेसाठी रजा करण्यात आला होती. मात्र, माझ्या अर्जावर निर्णय घेण्याऐवजी माझ्यावर विविध आरोप केले जात आहे. मला अमेरिकेत जाऊन शिकता आले तर माझ्या शाळेतील व देशातील विद्यार्थ्यांना फायदा होईल. परंतु माझ्या प्रामाणिकपणावरच संशय घेतला जात असल्याने माझ्यासमोर राजीनामा देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. (Ranjitsinh Disale News Updates)

Ranjitsinh Disale
राठोडांनी दाबलेला चौकशी अहवाल शिक्षणाधिकारी लोहारांनी काढला बाहेर

दरम्यान, डिसले यांना यांनी सोलापूर शिक्षण विभागाकडे 6 महिन्यांच्या रजेसाठी अर्ज केला होता. मात्र, त्यांच्या अर्जात त्रुटी असल्याचे कारण शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहे. तर, त्यांच्यावर काही गंभीर आरोपही करण्यात आलेत. यामध्ये ते गेल्या तीन वर्षापासून शाळेकडे फिरकले नाही. त्यांनी तीन वर्षांत काय केले याबाबतच्या चौकशीसाठीही समिती नेमली असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे सोलापूर शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. याबाबत 3 वर्षांच्या काळात डिसले गुरुजींनी काय केलं? याबाबत चौकशी समितीचा अहवाल जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे प्राप्त झाला असून, त्यांच्यावर शिक्षण अधिकाऱ्यांनी गंभीर आरोप केले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com