'ग्लोबल टीचर' डिसले गुरूजी आता थेट अमेरिकेतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणार!

ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले (Ranjitsinh Disale) यांनी आता मोठी घोषणा केली आहे.
Ranjitsinh Disale
Ranjitsinh DisaleSarkarnama

सोलापूर : ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते रणजितसिंह डिसले (Ranjitsinh Disale) यांनी आता मोठी घोषणा केली आहे. त्यांनी थेट अमेरिकेतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचे जाहीर केले आहे. डिसले यांना मिळालेल्या पुरस्काराच्या रकमेतून ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. दरम्यान, डिसले गुरुजींच्या विरोधात जिल्हा परिषदेने (Zilla Parishad) कठोर भूमिका घेतली आहे. डिसलेंनी माफीनामा सादर करून यावर पडदा टाकला असला तरी त्यांच्यावरील कारवाईची टांगती तलवार कायम आहे. (Ranjitsinh Disale News)

डिसले गुरुजींना ग्लोबल टीचर पुरस्काराची सात कोटी रुपयांची रक्कम जाहीर झाली होती. यातील अर्धी रक्कम त्यांनी स्पर्धेतील इतर 9 शिक्षकांना देण्याचे जाहीर केले होते. आता पुरस्कारातील रकमेतून त्यांनी अमेरिकेतील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. डिसले गुरुजी आणि 2018 मध्ये ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणाऱ्या नॉर्थ डाकोटा येथील शिक्षिका ज्युएल्के यांनी ही शिष्यवृत्ती सुरु केली आहे. ज्युएल्के या शिक्षणाची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांना मदत करतात. अमेरिकेतील निर्वासित आणि स्थलांतरित विद्यार्थ्यांसाठी 'द ज्युएलके-डिसले एज्युकेटर स्कॉलरशिप' सुरु करण्यात आली आहे. खुद्द डिसले यांनीच ट्विटरवरून ही घोषणा केली आहे. या स्कॉलरशिपसाठी असलेले नियम आणि अटीही त्यांनी दिल्या आहेत.

Ranjitsinh Disale
तुरुंगातील मुक्काम मंत्रिपुत्राला महागात; तातडीनं सरकारी रुग्णालयात हलवलं

डिसले गुरुजी प्रकरणात जिल्हा परिषदेने कठोर भूमिका घेतली आहे. डिसले गुरुजींच्या संदर्भात 2021 मध्ये झालेल्या चौकशीचा अहवाल प्राथमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे पाठविला आहे. हा विषय संवेदनशील असल्याने याची पडताळणी करण्याच्या सूचना स्वामी यांनी सामान्य प्रशासन विभागाला दिल्याचे समजते. डिसले गुरुजी यांचा माफीनामा, पाच जणांच्या चौकशी समितीचा अहवाल या बाबी जिल्हा परिषद बारकाईने व काटेकोरपणे हाताळत आहे.

Ranjitsinh Disale
वाद पेटला! आता भगवा झेंड्याच्या जागी फडकावला राष्ट्रध्वज

या सर्व प्रकरणात डिसले गुरुजींनी अडचणीत येताच माफीनामा सादर करून या वादावर पडदा टाकण्याचा निर्णय घेतला होता. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना डिसले यांनी दोन पानी पत्र पाठवले होते. या पत्रात त्यांनी झालेल्या प्रकाराबाबत माफी मागितली होती. यापुढे थेट प्रसारमाध्यमांसमोर जाणार नाही, अशी कबुलीही डिसले यांनी दिली होती. त्यांनी आता माफीनामा सादर करीत हे प्रकरण थांबवण्याची मागणी केली आहे. डिसले यांच्या माफीनाम्याची जोरदार चर्चा सध्या जिल्हा परिषदेत रंगली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com