Koregaon : सांगलीला पाणी दिल्याचे पुरावे द्या... शशिकांत शिंदेंचे महेश शिंदेंना आव्हान

Shashikant Shinde जिहे- कटापूर योजना बंद पाडण्यासाठीच या योजनेचे वर्गीकरण केल्याचा, तसेच सांगलीला पाणी देऊन साताऱ्याचे हक्काचे पाणी बाहेर पळवण्यास हातभार लावल्याच्या आमदार महेश शिंदे यांनी केलेल्या आरोपांना आमदार शशिकांत शिंदेंनी प्रत्युत्तर दिले.
MLA Mahesh Shinde, Shashikant Shinde
MLA Mahesh Shinde, Shashikant Shindesarkarnama

Koregaon News : विद्यमान लोकप्रतिनिधींनी जिहे- कटापूर योजनेला नाव देण्यापलीकडे काहीही केले नाही. सांगलीला पाणी दिल्यासंदर्भातील आपल्याकडे काही पुरावे असतील, तर ते द्यावेत. खरोखरच असा काही निर्णय झाल्याचे सिद्ध करून दाखवा, असे आव्हान आमदार शशिकांत शिंदे Shashikant Shinde यांनी आमदार महेश शिंदे Mahesh Shinde यांना पत्रकाद्वारे दिले आहे.

जिहे- कटापूर योजना बंद पाडण्यासाठीच या योजनेचे वर्गीकरण केल्याचा, तसेच सांगलीला पाणी देऊन साताऱ्याचे हक्काचे पाणी बाहेर पळवण्यास हातभार लावल्याच्या आमदार महेश शिंदे यांनी केलेल्या आरोपांना आमदार शशिकांत शिंदे प्रत्युत्तर दिले. यासंदर्भातील पत्रकात आमदार शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे, की खोटं बोल; पण रेटून बोल याशिवाय दुसरे काम लोकप्रतिनिधी करू शकत नाहीत.

जलसंपदामंत्री म्हणून संधी मिळाली, त्या वेळी पाणी वाटपासंदर्भात ‘ते’ म्हणत आहेत, असा कोणताही निर्णय झाला नाही. सुरुवातीला त्यांनी बारामतीला पाणी दिल्याचा आरोप केला. नंतर सांगलीला पाणी दिल्याचे सांगत आहेत. यासंदर्भात काही पुरावे असतील, तर ते त्यांनी द्यावेत. खरोखरच असा निर्णय झाल्याचे सिद्ध करून दाखवावे. रोज नवीन खोटं बोलून जनतेची किती दिवस फसवणूक करणार आहात?

MLA Mahesh Shinde, Shashikant Shinde
Koregaon : शशिकांत शिंदेंनी कोरेगाव, खटावला पाण्यासाठी उपेक्षित ठेवले; दहा वर्षे केवळ नारळ फोडले... महेश शिंदे

माझ्या जलसंपदामंत्री पदाच्या कार्यकाळात वसना- वांगणा प्रकल्प पूर्ण झाले. उरमोडी, नीरा- देवघरसह इतर प्रकल्पांना गती देण्याचाही प्रयत्न केला. डिस्कळ, ललगुण परिसरातील गावांना उचलून पाणी मिळवून देण्यासाठी फेरसर्वेक्षण करायला लावले. खिरखिंडी, रामोशीवाडी, चिमणगाव परिसराला उचलून पाणी देण्याचा निर्णयही त्याचवेळी घेतला. माण- खटावलाही पाणी देण्याचा निर्णय घेतला होता.

MLA Mahesh Shinde, Shashikant Shinde
Koregaon : कोरेगावच्या लोकप्रतिनिधींचे खोक्याला प्राधान्य...शशिकांत शिंदे

अलीकडेच त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दमबाजी करून रामोशीवाडीच्या पाझर तलावात पाणी सोडू दिले नाही. एवढे ते संकुचित वृत्तीचे आहेत. अधिकाऱ्यांना दमबाजी करून विकासकामांना थांबवण्याचे पाप ते करत आहेत. त्यामुळे नारळबाबा कोण? हे जनताच ठरवेल. ज्या वेळी उपमुख्यमंत्री आणि जलसंपदामंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी कोयनेचे उर्वरित पाणी विदर्भ- मराठवाड्याला देण्याची घोषणा केली, त्यावेळी आपण मूग गिळून गप्प का बसलात? आपण त्याला विरोध का केला नाही? फक्त नौटंकी म्हणून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, तसेच संबंधित मंत्र्यांबरोबर बैठकीचा फार्स करून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत असल्याचे पत्रकात नमूद आहे.

MLA Mahesh Shinde, Shashikant Shinde
Satara : हा तर सत्याचा, न्यायाचा विजय; बाळासाहेबांचा आशीर्वाद मिळाला : देसाई

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com