लष्कर भरतीत युवकांना वयोमर्यादेत सवलत द्या; श्रीनिवास पाटलांची लोकसभेत मागणी

याशिवाय कोरोनामुळे Corona सैन्य भरती Army Recruitment प्रक्रिया वारंवार स्थगित झाल्याने वयाच्या मर्यादेत आलेल्या इच्छुक तरूणांची संधी हुकली आहे. त्यांचे सैन्यात Army जाण्याचे स्वप्न धोक्यात येत आहे.
MP Srinivas Patil
MP Srinivas Patilsarkarnama

कऱ्हाड ः सैन्यदलात जाण्यासाठी अनेक तरूणांनी भरतीपूर्व तयारी केली आहे. मात्र कोरोनामुळे दोन वर्षापासून सैन्य भरती प्रक्रिया बंद आहे. कोरोना संकटाचे सावट कमी होत असल्याने केंद्र सरकारने सैन्य भरती मेळावे घेऊन देशसेवा करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या तरूणांना दिलासा द्यावा. भरती अभावी संधी गमावलेल्या युवकांना खासबाब म्हणून वयोमर्यादेत सवलत द्यावी अशी मागणी राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी लोकसभेत केली आहे.

खासदार श्रीनिवास पाटील यांनी लोकसभेत नियम 377 नुसार तातडीचे व लोकहितासाठी महत्वाचे मुद्दे सादर करून सभागृहांच्या पटलावर ठेवले. खासदार पाटील म्हणाले, कोरोना महामारीमुळे महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांपासून भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलातील भरती बंद आहे. विशेषत: सातारा जिल्ह्याला फार मोठी सैनिकी परंपरा असून ती परंपरा आजतागायत सुरू आहे.

MP Srinivas Patil
सातारा लोकसभा मतदारसंघातील विकासासाठी पाच कोटी : श्रीनिवास पाटील 

सातारा जिल्ह्यातून सैन्यदलात भरती होण्याचे प्रमाण प्रचंड आहे. येथील बहुतांश युवक सैन्यदलात जाण्यासाठी प्राधान्य देतात. त्यासाठी ते दोन-दोन वर्षे अगोदर शारीरिक व अन्य परिक्षेची तयारी करत असतात. सैन्यदलात जाण्याचे स्वप्न बाळगणारे तरूण त्यासाठी खूप मेहनत घेतात. मात्र कोरोनाने ओढावलेल्या परिस्थितीमुळे सैन्य भरती प्रक्रिया वारंवार स्थगित होत आहे. परिणामी त्यांची आलेली संधी हुकत असून त्यांचे स्वप्न हिरावून जात आहे. कोरोना महामारीचा प्रभाव आता कमी झाला आहे.

MP Srinivas Patil
Video: आर्थिक निकषांवर आरक्षण देऊन टाका; उदयनराजे भोसले

माझ्या सातारा लोकसभा मतदारसंघात अशी अनेक गावे आहेत जिथे प्रत्येक घरातील तरुण देशसेवेसाठी सैन्यात भरती होण्याचे स्वप्न बाळगतो. परंतु भरती प्रक्रियाच बंद असल्याने त्यांचे हे प्रयत्न धूळीस मिळत आहेत. याशिवाय कोरोनामुळे सैन्य भरती प्रक्रिया वारंवार स्थगित झाल्याने वयाच्या मर्यादेत आलेल्या इच्छुक तरूणांची संधी हुकली आहे. त्यांचे सैन्यात जाण्याचे स्वप्न धोक्यात येत आहे. अशा युवकांचे भविष्य, त्यासाठी ते घेत असलेले परिश्रम व त्यांची संपत चाललेली वयोमर्यादा लक्षात घेता भारत सरकारने खासबाब म्हणून अशा युवकांसाठी भरतीची वयोमर्यादा वाढवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in