गडाख-विखे सोयरिक
गडाख-विखे सोयरिकसरकारनामा

मंत्री गडाखांचा पुत्र आणि घुलेंची कन्या यांचं शुभमंगल ठरलं : राजकीय समीकरणही बदललं

अहमदनगर ( Ahmednagar ) जिल्ह्यात सोयऱ्या धायऱ्यांच्या राजकारणाचा प्रयोग नगर शहर व तालुक्यात कमालीचा यशस्वी झाला. त्याचे लोण आता जिल्हाभर पसरले आहे. याच राजकारणाचा पुढचा अध्याय घुले-गडाखांच्या सोयरिकीने लिहिला जात आहे.

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण हे पूर्वी सहकार व पीक-पाण्यावर आधारित होते. आता हळूहळू त्याला सोयऱ्याधायऱ्यांचे राजकारण असे स्वरुप येऊ लागले आहे. जिल्ह्यात सोयऱ्या धायऱ्यांच्या राजकारणाचा प्रयोग नगर शहर व तालुक्यात कमालीचा यशस्वी झाला. त्याचे लोण आता जिल्हाभर पसरले आहे. याच राजकारणाचा पुढचा अध्याय घुले-गडाखांच्या सोयरिकीने लिहिला जात आहे. Ghule-Gadakh is the next chapter in the politics of the relationship

मंत्री शंकरराव गडाख यांचे चिरंजीव तथा युवा नेते उदयन व माजी आमदार चंद्रशेखर घुले यांची कन्या डॉ. निवेदिता यांची सोयरिक ठरली आहे. या नवीन सोयरिकीचा परिणाम आगामी विधान परिषदेच्या निकालातून पहायला मिळण्याची शक्यता आहे. डॉ. निवेदिता या पुण्यातील भारती विद्यापीठात रेडिओ डायग्नोसिसमध्ये एमडीच्या दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत आहेत. तर उदयन गडाख यांनी अहमदनगर येथे एमबीएचे शिक्षण पूर्ण केले असून ते राजकारणात सक्रिय झाले आहेत.

गडाख-विखे सोयरिक
'मारुतराव घुले पाटलांनी समाजासाठी दिले आयुष्याचे दान'

या सोयरिकीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात जवळचे सोयरे होणार आहेत. चंद्रशेखर घुले आणि माजी आमदार नरेंद्र घुले हे सख्खे भाऊ आहेत. नरेंद्र घुले आणि माजी खासदार प्रसाद तनपुरे हे एकमेकांचे साडू आहेत. नरेंद्र घुले आणि प्रसाद तनपुरे या दोघांच्याही पत्नी या मंत्री जयंत पाटील यांच्या भगिनी आहेत. त्यामुळे पाटील आणि गडाख यांचेही नातेसंबंध प्रस्थापित होणार आहेत.

आमदार तथा शिर्डी देवस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे हे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचे मोठे जावई आहेत. तर घुले यांचे दुसरे जावई हे आता उदयन गडाख होतील. चंद्रशेखर घुले हे राष्ट्रवादीत आहेत. तर गडाख हे शिवसेनेचे मंत्री आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांचे नातेसंबंध हे आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीवर परिणाम करण्याची शक्यता आहे.

गडाख-विखे सोयरिक
पवार-विखे वादाला तरूणाई मैत्रीत बदलू पाहतेय...

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात गडाख आणि राजळे कुटुंबाचे हे जवळचे संबंध आहेत. त्यामुळेच राजकीय घराण्यांचे नातेसंबंध, सोयरिक हा विषय नेहमीच चर्चेचा ठरत आला आहे. या सोयरिकीच्या वेलीमध्ये आता घुलेंचीही भर पडली आहे. दुसरीकडे मंत्री शंकरराव गडाख यांचे सख्खे भाचे अॅड. राज देवढे हे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे सख्खे साडू आहेत. त्यामुळे तेथेही हा नातेसंबंधांचा वेल गेला आहे.

घुले-गडाख सोयरीकीचा परिणाम स्थानिक राजकारणावरही होणार आहे. घुले हे नगर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद मतदारसंघासाठी राष्ट्रवादीतून इच्छुक आहेत. या निवडणुकीत त्यांच्या पाठीमागे गडाख, तनपुरे, काळे, गडाख, राजळे, थोरात अशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष राजकीय ताकद उभी राहण्याची शक्यता आहे. या सोयरीकीचा राजकीय फायदा गडाख यांनाही होणार आहे. गडाख यांच्या नेवासा विधानसभा मतदारसंघात घुले यांचे काही प्रभावक्षेत्र आहे. त्यामुळे गडाखांना भविष्यात निवडणूक सोपी जाण्याचा इरादा असेल. दुसरीकडे घुले यांचे राजकीय क्षेत्र हे पाथर्डी-शेवगाव या मतदारसंघातही आहे. घुले यांचा विधान परिषदेत विजय झाल्यास तेथे भाजपच्या विद्यमान आमदार मोनिक राजळे यांच्यासाठी तो दिलासा असेल. कारण विधानसभेसाठी तेथील एक राजकीय प्रतिस्पर्धी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घुलेंची राजकीय नात्यातील या दोन्ही आमदारांना मिळू शकते.

गडाख-विखे सोयरिक
प्राजक्त तनपुरे आणि जयंत पाटील यांची विकासात्मक बाबींवर जुगलबंदी रंगली

नगर जिल्ह्यात नातेसंबंधातून राजकीय वर्चस्व अबाधित ठेवणारे इतरही सोयरेधायरे आहेत. त्यात आमदार अरुण जगताप, माजी आमदार शिवाजी कर्डिले व भानुदास कोतकर यांनी अशा नात्यांतून आपली पकड कायम ठेवली आहे. माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी त्यांची मोठी कन्या कोतकरांच्या घरात तर दुसरी कन्या जगतापांच्या घरात दिली आहे. तर कोतकर यांचीही कन्या जगतापांच्या घरात आहे.

अरुण जगताप यांनी विधान परिषदेवर सलग दोनवेळा विजय मिळवला. संदीप कोतकर एक वेळा महापौर, सुवर्णा कोतकर एक वेळा उपमहापौर तर संग्राम जगताप दोन वेळा आमदार व दोन वेळा महापौर झाले. हे केवळ यात सोयरेधायरे पॅटर्नची महत्वाची भूमिका राहिल्याने.

गडाख-विखे सोयरिक
खासदार विखे म्हणाले, कर्डिले होणार आमदार...

आगामी विधान परिषद निवडणुकीत कर्डिले-कोतकर-जगताप या `पॅटर्न`विरोधात आता घुले-गडाख-थोरात अशी लढाई असेल. त्याचे कारणही तसेच आहे. शिवाजी कर्डिले यांनी भाजपकडून विधान परिषदेच्या आखाड्यात उतरण्याची तयारी केली आहे. कर्डिलेंचे जावई व राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच नगर महापालिकेवर पकड आहे. सासऱ्यांच्या साथीला जगताप येणार की पक्षनिष्ठा पाळणार, अशी चर्चा होती. मात्र विधान परिषदेची ही निवडणूकच पुढे गेल्याने राजकीय वातावरण पुन्हा शांत झाले आहे. पण त्यासाठीची मोर्चेबांधणीही सोयरीकींमधून सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com