कोरोनातून सुटका कर; खंडोबा चरणी खासदार श्रीनिवास पाटलांची प्रार्थना

महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पाल येथील श्री खंडोबाचे मंदिर देखील भाविकासांठी खुले करण्यात आले आहे.
कोरोनातून सुटका कर; खंडोबा चरणी खासदार श्रीनिवास पाटलांची प्रार्थना
Srinivas Patil, Khndoba Palifacebook

कराड : घटस्थापनेपासून राज्यातील सर्व धार्मिक व प्रार्थना स्थळे उघडण्यात आल्यानंतर आज लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पाल (ता.कराड) येथील श्री खंडोबाचे साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी दर्शन घेतले. तसेच कोरोनाच्या संकटातून कायमस्वरूपी सुटका करावी. कोरोना व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांसह नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून त्यातून सावरण्यासाठी बळ द्यावे अशी, प्रार्थना खासदार पाटील यांनी श्री.खंडोबा चरणी केली.

राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार आजपासून धार्मिक स्थळे खुली करण्यात आली आहेत. त्यानुसार महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पाल येथील श्री खंडोबाचे मंदिर देखील भाविकासांठी खुले करण्यात आले आहे. त्यामुळे येथील श्री खंडोबा मंदिरास साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी आज भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांनी कोरोनाच्या संकटातून कायमस्वरूपी सुटका करावी. तसेच कोरोना व अतिवृष्टीमुळे शेतकरी वर्गासह नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून त्यातून सावरण्यासाठी बळ द्यावे, अशी प्रार्थनाश्री. खंडोबा चरणी केली.

Srinivas Patil, Khndoba Pali
धनंजय मुंडे यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतले;पाहा व्हिडिओ

अनेक दिवसानंतर मंदिरात जाऊन दर्शन घेण्याची संधी मिळाल्याने आनंद होत आहे. भाविकांनी सुध्दा दर्शनासाठी मंदिरामध्ये एकाचवेळी गर्दी करू नये, असे सांगून श्रीनिवास पाटील म्हणाले, कोरोना संसर्गाचा धोका लक्षात ठेवून धार्मिक स्थळांवर आरोग्याच्या नियमांचे काटेकोर पालन करावे. शिस्त व सुरक्षितता बाळगून आपआपली जबाबदारी सर्वांनी पार पाडावी. तसेच त्यांनी सातारा जिल्हावासियांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पाल देवस्थानचे विश्वस्त देवराज पाटील, सर्जेराव खंडाईत, बाबासाहेब शेळके, संजय काळभोर, धनराज गुरव, जयवंत खंडाईत, प्रसाद गुरव, आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Stories

No stories found.