Solapur Dcc Bank : आमदार राजेंद्र राऊतांचा ‘होमवर्क’ जोरात; उद्याच्या सर्वसाधारण सभेत भिडणार

बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी हा प्रश्‍न हाती घेतला आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची वार्षिक सर्वसाधारण सभेत उद्या (ता. २१ सप्टेंबर) आमदार राऊत यांचे समर्थक जिल्हा बॅंकेच्या प्रशासकांशी जोरदार भिडण्याची शक्‍यता आहे.
Shailesh Kotmire-Solapur DCC-Rajendra Raut
Shailesh Kotmire-Solapur DCC-Rajendra RautSarkarnama

सोलापूर : सोलापूर (Solapur) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने (District Bank) बार्शी (Barshi) तालुक्‍यातील आर्यन शुगरची विक्री केली आहे. बीड राष्ट्रवादीचे नेते बजरंग सोनवणे यांच्या येडेश्‍वरी ऍग्रोने हा कारखाना विकत घेतला असून या कारखान्याच्या व्यवहारानंतर शेतकऱ्यांच्या एफआरपीचा मुद्दा प्रकर्षाने समोर आला आहे. बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) यांनी हा प्रश्‍न हाती घेतला आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची वार्षिक सर्वसाधारण सभा उद्या (ता. २१ सप्टेंबर) सकाळी ११ वाजता बॅंकेच्या मुख्यालयात होणार आहे. या सभेत आमदार राऊत यांचे समर्थक जिल्हा बॅंकेच्या प्रशासकांशी जोरदार भिडण्याची शक्‍यता आहे. (General meeting of Solapur District Cooperative Bank tomorrow)

Shailesh Kotmire-Solapur DCC-Rajendra Raut
गंभीर आजारातून उठताच शहराचे कारभारी आमदार लक्ष्मण जगताप पुन्हा झाले आक्रमक

जिल्हा बॅंकेवर सध्या राज्याचे अप्पर निबंधक शैलेश कोतमिरे हे प्रशासक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या काळातच या कारखान्याची विक्री झाली आहे. या कारखान्याकडे ३६० कोटी रुपयांची येणेबाकी होती. सुमारे ६८ कोटी रुपयांना हा कारखाना विकला आहे. या कारखान्याचा विक्री होण्यापूर्वी कारखान्याने गाळप केलेल्या उसाचे २१ कोटी रुपये शेतकऱ्यांना अद्यापही मिळालेले नाहीत. शेतकऱ्यांची एफआरपी आगोदर द्या मग बाकीचे व्यवहार करा अशी ठाम भूमिका आमदार राऊत यांनी घेतली आहे.

Shailesh Kotmire-Solapur DCC-Rajendra Raut
एकनाथ शिंदेंना ठाण्यात पहिला झटका; माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश!

एफआरपीच्या मुद्यांवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आमदार राऊत, कारखाना विकत घेणारे बजरंग सोनवणे, जिल्हा बॅंकेचे अधिकारी यांच्यासोबत आठ सप्टेंबर रोजी सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. जिल्हा बॅंक आणि सोनवणे यांनी शेतकऱ्यांच्या एफआरपीचे पैसे १५ दिवसांत द्यावेत, अशा सूचना केल्या आहेत.

Shailesh Kotmire-Solapur DCC-Rajendra Raut
पृथ्वीराज चव्हाणांना त्या बैठकीत काँग्रेस नेत्यांनी बोलूही दिले नाही!

या सर्व पार्श्‍वभूमीवर उद्या (बुधवारी) बॅंकेची सर्वसाधारण सभा होणार असल्याने या सभेत आर्यन शुगरच्या व्यवहाराचा व आर्यन आणि विजय शुगरकडे थकित असलेल्या एफआरपीचा मुद्दा प्रामुख्याने चर्चेला येण्याची शक्‍यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in