Karad : गायरान जमीन प्रश्न : दलित महासंघ मुख्यमंत्र्यांना घेराव घालणार

सर्व अर्थिक विकास महामंडळाची All Economic Development Corporations कर्जमाफी loan waiver करावी अशी मागणीही मुख्यमंत्र्यांकडे CM Eknath Shinde करण्यात येणार आहे.
CM Eknath Shinde
CM Eknath Shindesarkarnama

कऱ्हाड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या शुक्रवारी कऱ्हाड दौऱ्यावर येत आहेत. गायरान जमिनीवरील अतिक्रमणे कायम करावीत या मागणीकडे राज्य सरकारने दूर्लक्ष केल्याने दलित महासंघाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या प्रश्नी मुख्यमंत्र्यांना कराड दौऱ्यात घेराव घालण्याचा इशारा दलित महासंघाने दिला आहे.

गायरान जमिनीवरील २०२२ पर्यंतची अतिक्रमणे कायम करावीत, या मागणीसाठी घेराव घालणार असल्याची माहिती दलित महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष प्रकाश वायदंडे यांनी दिली. संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे यांच्यासह पदाधिकारी सहभागी होणार आहेत.

सर्व अर्थिक विकास महामंडळाची कर्जमाफी करावी अशी मागणीही मुख्यमंत्र्यांकडे करण्यात येणार आहे. आंदोलन यशस्वी करण्यासाठी दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष रमेश सातपुते, बहुजन समताचे जिल्हाध्यक्ष राम दाभाडे, उपाध्यक्ष सुरज घोलप, खटाव तालुका प्रभारी शंकर तुपे, कऱ्हाड तालुका अध्यक्ष जयवंत सकटे ,सुहास पिसाळ, सुर्यकांत काळे आदि परिश्रम घेत आहेत.

CM Eknath Shinde
गायरान जमिनीबाबत आमदार पवार, शिंदे यांचे सरकारला साकडे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com