गरबा दांडियाला बंदी : नवरात्रौत्सवाबाबत कडक निर्बंध

महाराष्ट्रातील ( Maharashtra ) कोरोना ( Corona ) स्थिती पाहता यंदा सार्वजनिक गणेशोत्सवा प्रमाणे नवरात्रौत्सवही ( Navratri festival ) साधेपणाने साजरा होणार आहे.
Navratri festival
Navratri festival Sarkarnama

मुंबई : महाराष्ट्रातील कोरोना स्थिती काही अपवादात्मक जिल्हे वगळता आटोक्यात येऊ लागली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच नवरात्रौत्सवापासून राज्यातील सर्व मंदिरे खुली होतील अशी घोषणा केली होती. मात्र राज्यातील कोरोना स्थिती पाहता यंदा सार्वजनिक गणेशोत्सवा प्रमाणे नवरात्रौत्सवही साधेपणाने साजरा होणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने सार्वजनिक नवरात्रौत्सव साजरा करण्याबाबत मार्गदर्शक सूचना आज जाहीर केल्या. Garba Dandiya banned: Strict restrictions on Navratri festival

या मार्गदर्शक सूचने नुसार 7 ते 15 ऑक्टोबर दरम्यान नवरात्रौत्सव, दुर्गापूजा तसेच दसरा सण साजरा करण्यात यावा असे निर्देश देण्यात आले आहेत. कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी अजूनही कोरोनाचा धोका कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन गर्दी करुन उत्सव साजरा करणे योग्य होणार नाही. नवरात्रौत्सव साजरा करताना सर्व नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टिकोनातून योग्य ती खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे.

Navratri festival
मोठी बातमी : घटस्थापनेपासून सर्व मंदिरे खुली

राज्य सरकारने दिलेल्या सूचनांत म्हटले आहे की, कोरोना संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता कोरोना विषयक नियमांचे पालन करावे. सार्वजनिक नवरात्रौत्सवासाठी मंडळांनी महापालिका अथवा स्थानिक प्रशासन यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे.

कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता आणि महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपांबाबतचे धोरण या नुसारच मंडप उभारण्यात यावेत. नवरात्रौत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्यासाठी घरगुती तसेच सार्वजनिक देवीच्या मूर्तीची सजावट करण्यात यावी, असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे.

Navratri festival
गुजरातला गरबा बंद, मग महाराष्ट्रात मागणी कशाला? तटकरेंचा भाजपला सवाल

अशा असाव्यात देवीच्या मूर्ती

या निर्देशात पुढे म्हणले आहे की, देवीच्या मूर्तीची उंची सार्वजनिक मंडळांकरीता 4 फूट व घरगुती देवीच्या मूर्तीची उंची 2 फूटांच्या मर्यादेत असावी. मागील वर्षी प्रमाणे शक्यतो देवीच्या मूर्तीऐवजी घरातील धातू, संगमरवर आदी मूर्तीचे पूजन करावे. मूर्ती शाडूची तसेच पर्यावरणपूरक असल्यास तिचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास कृत्रीम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाशी समन्वय ठेवावा.

मंडप उभारताना

नवरात्रौत्सवासाठी वर्गणी, देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा, जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही. आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात येईल. “माझे कुटुंब, माझी जबाबदारी" या मोहिमेबाबत देखील नवरात्रौत्सवात जनजागृती करण्यात यावी, अशा सूचना मंडळांना देण्यात आल्या आहेत.

Navratri festival
नवरात्रौत्सवात यंदा गरबा, दांडियाला बंदी; गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना

नवरात्रौत्सवाचे कार्यक्रमाबाबत

गरबा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करु नयेत. त्याऐवजी आरोग्य विषयक उपक्रमे, शिबिरे (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंगी आदी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे यंदा सार्वजनिक नवरात्रौत्सव असला तरी गरबा, दांडिया सारखे कार्यक्रमांवर बंदी राहील.

देवीच्या दर्शना बाबत...

देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी. देवीच्या मंडपांमध्ये प्रत्यक्ष येऊन दर्शन घेणाऱ्या भाविकांच्या बाबतीत राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने कोरोना विषयक दिलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.

आरती, भजन, कीर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना गर्दी होणार नाही. तसेच ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतूदींचे पालन करण्यात यावे. मंडपात एकावेळी 5 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांची उपस्थिती नसावी. तसेच मंडपांमध्ये खाद्यपदार्थ अथवा पेयपानाची व्यवस्थेला मनाई आहे.

यंदा मिरवणूक नाही

राज्य सरकारच्या आदेशा नुसार यंदा देवीच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढता येणार नाही. विसर्जनाच्या पारंपारिक पध्दतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांना सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील अथवा इमारतीतील सर्व घरगुती देवीच्या मुर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढता येणार नाही. विसर्जनाच्या तारखेस जर घरगुती तसेच सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाचा परिसर प्रतिबंधीत क्षेत्रात असेलतर, मूर्ती विसर्जन सार्वजनिक ठिकाणी करण्यास मनाई असेल.

रावण दहनाला परवानगी पण...

दसऱ्याच्या दिवशी करण्यात येणारा रावण दहनाचा कार्यक्रम हा सर्व न नियम पाळून करावा. रावण दहनाकरीता आवश्यक तेवढ्या किमान व्यक्तीच कार्यक्रमस्थळी हजर राहतील. फेसबुक इत्यादी समाज माध्यमातून थेट प्रक्षेपणाद्वारे बघण्याची व्यवस्था करावी, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत.

राज्य सरकारच्या या सूचना असल्या तरी प्रत्येक जिल्हा व तेथील स्थानिक प्रशासन तेथील कोरोना स्थिती पाहून आणखी महत्त्वाचे आदेश देऊ शकणार आहेत. त्यामुळे यंदाचा नवरात्रौत्सवही कोरोना नियमांच्या सावटात जाणार हे स्पष्ट झाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com