सोलापूरात मशरूम गणपती मंदिराचा २८ तोळ्याचा कळस चोरीला...

Solapur : येथे दुसऱ्यांदा अशी घटना घडली आहे.
Mushroom Ganpati Temple, Crime News
Mushroom Ganpati Temple, Crime News Sarkarnama

सोलापूर : अष्टविनायक गणपती पैकी सातवा गणपती म्हणून संबोधल्या जाणाऱ्या आणि सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या तळे हिप्परगा येथील मशरूम गणपतीचा सोन्याचा कळस बुधवारी (ता.३१ ऑगस्ट) सकाळी चोरीला गेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या कळसाला २८ तोळे सोन्याच्या मुलामा दिलेला होता. सुमारे २५ किलो वजनाचा हा कळस असल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे सहा वर्षांनंतर पुन्हा दुसऱ्यांदा हा प्रकार घडला आहे. (Solapur Ganpati Temple, Crime News)

Mushroom Ganpati Temple, Crime News
भाजप-मनसे युतीबाबत अहिरांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात रंगली चर्चा

शहराच्या लगत असलेल्या तळे हिप्परगा येथील मशरूम गणपती शहराचं भूषण मानलं जातं. मंगळवारी (ता.३० ऑगस्ट) रात्री पुजाऱ्याने रोजची पूजा आटोपून मंदिर बंद केले होते. नेहमीप्रमाणे पुजारी संजय पतंगे हे पहाटे चारच्या सुमारास पूजेच्या निमित्ताने उठले होते. मात्र मंदिरात येण्यापूर्वी सवयीप्रमाणे आधी कळसाचे दर्शन घेण्यासाठी त्यांवी कळसाकडे बघितले. मात्र कळस दिसला नाही. यामुळे कळस चोरला गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं. तेव्हा त्यांनी तातडीने भक्त मंडळाचे अध्यक्ष राजू हौशेट्टी यांना कल्पना दिली आणि तातडीने हालचाली गतिमान झाल्या.

Mushroom Ganpati Temple, Crime News
बावनकुळेंच्या बारामती दौऱ्यावर फडणवीस म्हणाले, भाजपचं मिशन बारामती नसून...

यानंतर सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात झालेल्या प्रकार कळवण्यात आला. या प्रकाराबाबत पुजारी संजय निंबाळकर यांनी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली असून पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. पोलिसांनी भा.दं. वि. ३७९ अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आता पुढील तपास फौजदार सुरज निंबाळकर करीत असल्याची माहिती मिळत आहे.

Mushroom Ganpati Temple, Crime News
एकदम Ok : शहाजी बापू म्हणाले, जयाभाऊच भावी मंत्री...

दरम्यान, सहा वर्षांपूर्वीही ६ जुलै २०१६ साली मंदिराचा कळस चोरीला गेला होता. तत्कालीन पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी तातडीने तपास करून २४ तासात तो कळस शोधून मंदिर व्यवस्थापनाच्या ताब्यात दिला होता. मात्र यावेळी तसा तपास करून कळस मंदिराला परत मिळेल का?, असा प्रश्न आता परिसरातील नागरिकांना पडला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com