प्राजक्त तनपुरेंचे गणरायाला साकडे : गुवाहाटीवरून आलेल्या सरकारकडून जनसामान्यांना न्याय मिळू दे...

आमदार प्राजक्त तनपुरे ( Prajakt Tanpure ) यांनी बाप्पांना साकडे घातले.
Prajakt Tanpure
Prajakt TanpureSarkarnama

Prajakt Tanpure : "गुवाहाटी वरून आलेल्या सरकारच्या माध्यमातून जनसामान्यांना चांगल्या प्रकारे न्याय मिळू दे. कोणाचेही सरकार असले. तरी सर्वसामान्य जनतेला हिताचे होऊ दे," असे साकडे माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे ( Prajakt Tanpure ) यांनी गणपती बाप्पांना घातले.

राहुरी येथे मळगंगा तरुण मंडळाच्या गणेशमूर्तीच्या स्थापने प्रसंगी मनोगत व्यक्त करतांना आमदार प्राजक्त तनपुरे यांनी बाप्पांना साकडे घातले. मानाचा गणपती आझाद मंडळाची मुर्ती स्थापना अध्यक्ष भिमराज रणसिंग यांनी सपत्नीक केली. चाचा तनपुरे यांच्या व्यंकटेश तरूण मंडळाची मुर्ती स्थापना प्रतिक तनपुरे यांनी सपत्नीक केली. यावेळी "सर्वांना उत्तम आरोग्य लाभावे. आवश्यक तेवढा पाऊस होऊन सर्वांना धन संपदा लाभो." अशी चाचा तनपुरे यांनी बाप्पांच्या चरणी प्रार्थना केली.

Prajakt Tanpure
रोहित पवारांच्या मतदारसंघात बैलगाडे सुसाट : प्राजक्त तनपुरे म्हणाले...

शहरातील श्रीरामदत्त मित्र मंडळाच्या मूर्तीची स्थापना सागर शेटे यांनी सपत्नीक केली. शिवाजी चौक मित्र मंडळाची मूर्ती स्थापना विक्रम डहाळे यांनी सपत्नीक केली. शिवाजी सोनवणे यांचे श्रीराम मंडळ, आर. आर. तनपुरे यांचे सातपीर बाबा मित्रमंडळ, मंदार धुमाळ यांचे श्रीदत्त मंडळ, राजेंद्र उंडे यांचे ज्ञानेश्वर युवा प्रतिष्ठान, स्वास्तिक तरुण मंडळ, वाल्मिक मित्र मंडळ, महावीर तरुण मंडळ, गजानन तरुण मंडळाच्या गणेशमूर्तींची उत्साहात स्थापना करण्यात आली.

घरगुती गणपती बाप्पांच्या स्थापनेसाठी बालगोपाळांसह वृद्धांची लगबग सुरू होती. कोरोनातील दोन वर्षांच्या खंडानंतर यंदाचा गणेशोत्सव आनंदात व उत्साहात साजरा होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com