गजानन कीर्तिकरांनी साधला रोहित पवारांवर निशाणा : म्हणाले...

खासदार गजानन कीर्तिकर ( Gajanan Kirtikar ) अहमदनगर दौऱ्यावर आले असता त्यांनी कर्जत येथील शिवसेना कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
Gajanan Kirtikar
Gajanan Kirtikarsarkarnama

अहमदनगर - शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर ( Gajanan Kirtikar ) अहमदनगर दौऱ्यावर आले असता त्यांनी कर्जत येथील शिवसेना कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी बोलताना खासदार गजानन कीर्तिकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली. ( Gajanan Kirtikar targets Rohit Pawar: Said ... )

गजानन कीर्तिकर म्हणाले, शिवसेना नगरसेवक व कार्यकर्त्यांनी सांगितलेल्या कामे मंजूर होऊनही निधी मिळत नसेल तर त्या कामांची यादी करून जिल्हा संपर्क प्रमुखांकडे, माझ्या कडे द्या. मी ही यादी मुंबईत घेऊन जाईल. आम्हाला आमच्या निधीचा वाटा मिळाला पाहिजे. असे जर त्यांचे वागणे असेल तर तुम्ही पक्ष वाढवा. मात्र पक्ष वाढविताना प्रतिपक्षाला नामोहरण करण्यासाठी त्यांनी निधी, पदे मिळू नयेत. दबाव टाकून शिवसेना सोडायला लावणे हा प्रकार शोभणारा नाही, असा इशारा त्यांनी आमदार रोहित पवार यांनी दिला.

Gajanan Kirtikar
Video : रोहित पवार म्हणतात, अनिल देशमुख लवकरच बाहेर येतील

ते पुढे म्हणाले की, तुला काम पाहिजे असेल तर शिवसेना सोड असे शिवसेना कार्यकर्त्याला सांगण्याचे धंदे रोहित पवार यांनी बंद करा. शिवसेना नगरसेवकांचा जिल्हा नियोजनकडून मिळालेला निधी दिला पाहिजे. या संदर्भात अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मी पत्र लिहिणार आहे. निधी मिळाला नाही तर त्याची तक्रार मी स्वतः मुख्यमंत्र्यांकडे करेल.

Gajanan Kirtikar
रोहित पवार-राम शिंदे एकाच मंचावर : ना एकमेकांकडे पाहिले... ना बोलले...

आघाडीचा धर्म या ठिकाणी रोहित पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पाळणार नसेल तर पुढील निवडणुकीत आघाडीचा धर्म पाळण्याचे बंधन आमच्यावर असणार नाही. त्यावेळी कर्जत-जामखेडमधील शिवसैनिकांनी हिसका दाखवावा, असा आदेशही त्यांनी शिवसैनिकांना दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com