Satara : 'ईडी'ची भीती दाखवून राज्यात सत्ता मिळवली... पृथ्वीराज चव्हाण

देशाची अर्थव्यवस्था उद्‌ध्वस्त economy collapsed झाली असून, विकासदर ढासळला Growth slowed आहे. कर्ज वाढले Debt increased आहे, असेही श्री. चव्हाण prithviraj Chavan यांनी नमुद केले.
Prithviraj Chavan, Devendra Fadanvis
Prithviraj Chavan, Devendra Fadanvissarkarnama

मलकापूर : राज्याची सत्ता 'ईडी'ची भीती दाखवून पैशाचा वापर करून मिळवली आहे. राज्यात सत्ता स्थापन करताना पक्षांतर कायद्याचे उल्लंघन झाले असूनही त्यांच्यावर कारवाई नाही. पैशाचे महत्त्व वाढून विचाराचे महत्त्व कमी झाले आहे. सध्या राजकीय पक्ष पैशावर, जातीवर अवलंबून आहेत, अशी टीका Congress Leader माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांवर केली.

(कै.) आनंदराव चव्हाण व (कै.) प्रेमलाताई चव्हाण यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून येथील पालिकेतर्फे प्रेमलाताई चव्हाण कन्या सुरक्षा अभियानाचा वर्धापनदिन व विविध कार्यक्रमाप्रसंगी आमदार चव्हाण बोलत होते. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, नगराध्यक्षा नीलम येडगे, उपाध्यक्ष मनोहर शिंदे, अजित पाटील-चिखलीकर, जयवंत जगताप, हिंदुराव पाटील प्रमुख उपस्थित होते.

Prithviraj Chavan, Devendra Fadanvis
तसं काही मनात असतं तर, आम्ही सभागृहातच गेलो नसतो... अशोक चव्हाण

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘‘माझ्या आई-वडिलांनी माझ्यावर चांगले संस्कार घडवले. अतिशय खडतर परिस्थितीतही कॉँग्रेसचे विचार जिवंत ठेवला. सध्या देशात हिंदू धर्माचा राजकारणासाठी वापर केला जात असून, मनुस्मृतीवर आधारित राजकारण सुरू आहे. लोकशाही मोडीत काढून देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू आहे.

Prithviraj Chavan, Devendra Fadanvis
थोडे दिवस जाऊ द्यात...मुख्यमंत्र्यांचे डोक ठिकाणावर येईल...नाना पटोले

''देशाची अर्थव्यवस्था उद्‌ध्वस्त झाली असून, विकासदर ढासळला आहे. कर्ज वाढले आहे. देश बिकट अवस्थेतून चालला आहे. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी सामान्य जनतेने प्रयत्न केले पाहिजेत. भाजपने अपयश झाकण्यासाठी, सरकारी कंपन्या, शासकीय जमीन विकण्याचा सपाटा लावला आहे.’’ यावेळी इंद्रजित चव्हाण, मंगल गलांडे, शंकरराव खबाले, विद्याताई थोरवडे, धनाजी काटकर, नामदेव पाटील, नितीन थोरात, प्रकाश पाटील, पी. जी. कागदी, बिस्मिला सय्यद, प्राचार्य सतीश माने, राहुल मर्ढेकर आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in