अण्णा बोला की होऽऽऽ... : आमदार चंद्रकांत जाधवांच्या कुटुंबीयांंनी फोडला हंबरडा

आमदार चंद्रकांत जाधव यांच्यावर कोल्हापुरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
MLA Chandrakant Jadhav
MLA Chandrakant JadhavSarkarnama

कोल्हापूर : ‘आण्णा आम्ही पोरके झालो‘, अशीच जनभावना आज कॉंग्रेसचे (Congress) आमदार चंद्रकांत जाधव (Chandrakant Jadhav) यांच्या अंत्ययात्रेवेळी आज प्रत्येकाच्या मनी होती. शहराच ठिकठिकाणी त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. सर्वपक्षीय कार्यकर्ते अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. पंचगंगा स्मशानभूमी येथे त्यांच्यावर सायंकाळी साडेसातच्या सुमारास शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले होते. दरम्यान, जाधव यांचे पार्थिव आज (ता. २ डिसेंबर) दुपारी त्यांच्या निवासस्थानी आले आणि कुटुंबीयांच्या अश्रुंचा बांध फुटला. अण्णा बोला की हो अण्णाऽऽऽ असा हंबरडा कुटुंबीयांनी फोडला. (Funeral of MLA Chandrakant Jadhav in Kolhapur)

जिल्हाधिकारी राहूल रेखावार, पोलिस दलातर्फे पोलिस अधीक्षक डॉ. शैलेश बलकवडे यांनी जिल्हा प्रशासनातर्फे पुष्पहार अर्पण केले. पोलिस कर्मचाऱ्यांनी हवेत तीन फैरी झाडून जाधव यांना मानवंदना दिली. स्मशानभूमीतील वातावरण काही काळ स्तब्ध झाले. पालकमंत्री सतेज पाटील. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, खासदार प्रा. संजय मंडलिक, सकाळ माध्यम समुहाचे संपादक संचालक श्रीराम पवार, ज्येष्ठ उद्योजक व्ही. बी. पाटील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, राजू लाटकर, आदिल फरास, तौफिक मुल्लाणी आदी उपस्थित होते. दुपारी तीनच्या सुमारास जाधव यांच्या अंत्ययात्रेस त्यांच्या निवासस्थानापासून सुरवात झाली.फुलांनी सजवलेल्या टॅक्टर ट्रॉलीत त्यांचे पार्थिव ठेवले होते.

MLA Chandrakant Jadhav
आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन

कुटुंबीयांना फोडला हंबरडा

ज्या बंगल्यातून आमदार चंद्रकांत जाधव बाहेर पडले की घरच्या मंडळींना ते माघारी किती येतील, याचे वेध लागायचे. सकाळपासून मतदारसंघातील कामे, कारखान्याच्या जोडण्या, दैनंदिन कार्यक्रम यात जाधव यांचा वेळ निघून जायचा. सम्राटनगर येथील त्यांचे निवासस्थान हे अनेकांच्या हक्कांचे घर बनले होते. आज दुपारी जाधव यांचे पार्थिव आणले गेले आणि कुटुंबीयांच्या अश्रुंचा बांध फुटला. आण्णा बोला की हो आण्णाऽऽऽ असा हंबरडा फोडला. त्यांच्या पत्नी जयश्री यांच्यासह कुटुंबातील सदस्यांना अश्रू अनावर झाले. रेड्याच्या टक्कर परिसरात आमदार प्रकाश आवाडे यांनी अंत्यदर्शन घेतले. माजी आमदार सत्यजित पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी अंत्यदर्शन घेतले.

MLA Chandrakant Jadhav
संजय काळेंच्या बिनविरोधसाठी आमदार बेनके लागले कामाला; आशा बुचकेंच्या भूमिकेकडे लक्ष

कॉंग्रेस कार्यालयात श्रद्धांजली

आमदार चंद्रकांत जाधव यांना कॉंग्रेस समिती कार्यालयात आज श्रद्धांजली वाहण्यात आली. दुपारी अडीचच्या सुमारास जाधव यांचे पार्थिव येथे आणले. कॉंग्रेसच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांनी जाधव यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. दोन मिनिटे स्तब्धतता पाळल्यानंतर कॉंग्रेस समितीही काही क्षणांसाठी भावूक झाली.

MLA Chandrakant Jadhav
दोन मंत्री, तीन आमदार जिल्हा सहकारी बॅंक निवडणुकीच्या रिंगणात!

पालकमंत्री पाटील, खासदार मंडलिक, आमदार पी. एन. पाटील, आमदार राजूबाबा आवळे, आमदार प्रकाश आबिटकर, गोकुळचे अध्यक्ष विश्‍वास पाटील, व्ही. बी. पाटील. राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर. आमदार ऋतुराज पाटील, प्रल्हाद चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष राहूल पाटील, दिलीप मोहिते. राष्टवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी महापौर निलोफर आजरेकर, शिवसेना जिल्हाप्रमूख संजय पवार, वसंत मुळीक, शहराध्यक्ष आर. के. पोवार, ललित गांधी, आनंद माने, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, संजय शेटे, दिलीप पोवार, राजू लाटकर,भय्या माने, संजय वाईकर, सुलोचना नायकवडी, सत्यजीत कदम, राजसिंह शेळके आदींनी आदरांजली वाहिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com