
बारामती : एकरकमी एफआरपीचा (FRP) निर्णय उसउत्पादकांसाठी दिलासादायक असून राज्य सरकारचे आज (ता.३० नोव्हेंबर) बारामतीत शेतकरी कृती समितीच्या वतीने अभिनंदन केले गेले. पृथ्वीराज जाचक, रंजन तावरे व सतीश काकडे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. या प्रसंगी भाजपचे जिल्हा सरचिटणिस अविनाश मोटे, तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे, स्वाभिमानीचे राजेंद्र ढवाण उपस्थित होते.
मुंबईत सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या बैठकीची माहिती पृथ्वीराज जाचक यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह सरकारने राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्या मागण्यांबाबत पर्यायाने उसउत्पादकांबाबत जी सकारात्मकता दाखविली, तत्परतेने निर्णय घेतले या बद्दल या तिन्ही नेत्यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. (Farmers Action Committee in Baramati, Latest News)
चालू हंगामाच्या रिकव्हरीवर एक रकमी एफआरपी देणे, कारखान्यांचे वजनकाटे ऑनलाईन व डिजिटल करणे, गोपीनाथ मुंडे महामंडळाच्या वतीने उसतोडीची यंत्रणा देणे,असे महत्वाचे निर्णय या बैठकीत सरकारने घेतले. दोन कारखान्यातील अंतराची मर्यादा हटविण्याबाबतही सरकार सकारात्मक आहे,असे पृथ्वीराज जाचक यांनी नमूद केले. राजू शेट्टी यांचा पाठपुरावा व भाजपचे पांडुरंग कचरे व अविनाश मोटे यांची यात मदत झाल्याचे त्यांनी नमूद केले.
रंजन तावरे म्हणाले, या निर्णयाने शेतक-यांना न्याय मिळेल, कारखानदारांनीही आता मानसिकता बदलण्याची गरज आहे. इथेनॉलबाबतही तसेच यांत्रिकीकरणाबाबतही आता नव्याने विचार करावा लागेल. तर सतीश काकडे म्हणाले, दोन कारखान्यातील 15 कि.मी. ची मर्यादा हटविण्याबाबत देवेंद्र फडणवीस सकारात्मक आहेत, 25 कि.मी.साठी केंद्राची मंजूरी मिळविण्यासाठी ते पाठपुरावा करणार आहेत.
राजु शेट्टी यांच्या आवाहनानंतर बारामती परिसरातील कारखाने बंद ठेवण्यात आले होते, त्यानंतर राज्य शासनाने एकरकमी एफआरपी देण्याबाबत निर्णय घेतल्याचे राजेंद्र ढवाण म्हणाले. पांडुरंग कचरे म्हणाले की, केवळ भाजपच बळीराजाचे खरे कैवारी असल्याचे या निर्णयाने सिध्द झाले आहे.
सोमेश्वरने एकरकमी एफआरपी व्याजासह द्यावी, 10 डिसेंबरपर्यंत हे न झाल्यास नाईलाजाने कारखाना बंद पाडू. उसतोडीसाठी शेतक-यांकडे पैशांची मागणी सुरु झाली असून संचालक मंडळाने यात लक्ष घालावे,अशी मागणी सतीश काकडे यांनी केली.
अमित शहा सकारात्मक...
निर्मला सीतारामन व प्रल्हाद सिंग यांच्या मार्फत सहकारमंत्री अमित शहा यांच्याकडे विविध मागण्या मांडण्यात आल्या असून त्यावर सकारात्मक निर्णय लवकरच होतील, असे भाजपचे लोकसभा प्रमुख अविनाश मोटे यांनी सांगितले.
छोटे हार्वेस्टर हवे...
रंजन तावरे म्हणाले,नितीन गडकरी यांनी पुढाकार घेत आता उसतोडीसाठी छोटे हार्वेस्टर तयार होण्याची आता गरज आहे.इथेनॉलवर चालणारा हार्वेस्टर शेतक-यांच्या मुलाला चांगला व्यवसाय बनू शकेल.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.