`अगस्ती`च्या चार संचालकांचे एका महिलेसोबत चाळे : ZP च्या माजी सदस्याचा आरोप

अकोले तालुक्यातील अगस्ती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जवळ आली आहे.
online friend sexually assults and blackmail woman police officer
online friend sexually assults and blackmail woman police officer Sarkarnama

अहमदनगर - अकोले तालुक्यातील अगस्ती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जवळ आली आहे. यातच शिवसेनेचे तालुक्यातील नेत्यांनी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाजीराव दराडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. यावर बाजीराव दराडे यांनी पत्रकार परिषद घेऊन अगस्ती सहकारी साखर कारखान्यातील चार ज्येष्ठ संचालकांवर महिलेबरोबर अश्लिल चाळे केल्याचा आरोप केल्याने जिल्ह्यात एकच गोंधळ उडाला आहे. ( Four directors of Agastya Sugar Factory have been accused of having sex with a woman )

शिवसेनेच्या नेते मधुकर तळपाडे व मच्छिंद्र धुमाळ यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन बाजीराव दराडे यांच्यावर आरोप केले होते. या आरोपांना प्रतिउत्तर देण्यासाठी दराडे यांनीही पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बाजीराव दराडे म्हणाले की, हॉटेलवर बसून दारू पाजणे ही माझी संस्कृती नाही. समशेरपूर परिसरात त्यांचे वागणे कसे आहे. हे सर्वांना माहिती आहे. माझ्या वडिलांचे माझ्यावर किती प्रेम होते. हे सर्व विभागाने पाहिले आहे. मधुकर तळपाडे यांनी त्यांच्या आई-वडिलांना कसे वागविले हे तालुक्याला माहिती आहे. सामाजिक कामाबद्दल त्यांना बोलण्याचा अधिकार नाही, असा आरोप दराडे यांनी केला.

online friend sexually assults and blackmail woman police officer
डाॅ. लहामटे का म्हणाले, मी पळकुटा आमदार नाही

ते पुढे म्हणाले की, सुपाऱ्या घेऊन शिवसेनेचा वापर करणे चुकीचे आहे. तालुक्यात शिवसेनेची पदे कुटुंबातील लोकांना वाटल्यामुळे तालुक्यातील शिवसेनेची स्थिती प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसारखी झाली आहे. हेच लोक पत्रकार परिषदेत पिस्तुल बाहेर काढत आहेत. त्यांच्या जीवाला पत्रकार परिषदेत कोणता धोका निर्माण झाला होता.

माझ्यावर आरोप करतात मात्र अगस्ती सहकारी साखर कारखान्यातील चार संचालकांनी मोठा आर्थिक गैरव्यवहार केला आहे. जो कारखाना आता विकायला काढला तर 80 कोटी रुपयांना जाईल त्या कारखान्यावर 400 कोटींचे कर्ज करून ठेवले आहे. शासनाला मी सांगेल या संचालकांच्या मालमत्ता जप्त करा. कारखाना तोट्यात असतानाही नफ्यात दाखवत कर्ज घेतले. कारखान्यातील इथेनॉल प्रकल्पातून इथेनॉल तयार होत नसताना खोटे सांगून 15 कोटींचे कर्ज घेतले.

online friend sexually assults and blackmail woman police officer
शरद पवार, मधुकर पिचड, गावित असे नेते चौदा किलोमीटर चालत त्या गावात पोहोचले होते..

अगस्ती कारखान्यातील चार संचालक मला थर्ड क्लास म्हणतात मात्र मी कोणत्याही महिलेला छेडलेले नाही. या संचालकांनी एका उच्च घराण्यातील 32 ते 40 वयोगटातील महिलेबरोबर गैरवर्तणूक केली. त्या महिलेला हे संचालक ब्लॅकमेल करत आहेत. हे चारही संचालक 52 ते 70 वयोगटातील आहेत. त्यांच्या मुलीच्या वयाच्या महिले बरोबर असे वागताना त्यांना काही वाटत नाही.

त्र्यंबकेश्वर येथील एका हॉटेलमध्ये या संचालकांना केलेल्या चाळ्यांचे फोटो आमच्याकडे आहेत. राजकारण एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन करायचे नसते म्हणून मी नावे जाहीर करत नाही. पांढरे शुभ्र कपडे घालून समाजाला ज्ञान पाजळणाऱ्या या लोकांनी दुसऱ्यांवर आरोप करू नये, असा टोलाही बाजीराव दराडे यांनी विरोधकांना लगावला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in