नगर रुग्णालय आग : डॉक्टर, तीन परिचारिका यांना जामीन

अहमदनगर ( Ahmednagar ) जिल्हा रुग्णालयातील कोविड ( Covid ) विभागाच्या अतिदक्षता विभागाला 6 नोव्हेंबर रोजी आग लागली होती. या आगीत 12 रुग्णांचा मृत्यू झाला.
नगर रुग्णालय आग :  डॉक्टर, तीन परिचारिका यांना जामीन
अहमदनगर जिल्हा रुग्णालयसरकारनामा

अहमदनगर : अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील कोविड विभागाच्या अतिदक्षता विभागाला 6 नोव्हेंबर रोजी आग लागली होती. या आगीत 12 रुग्णांचा मृत्यू झाला. या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात चार आरोपींना अटक करण्यात आली होती. Four accused in Ahmednagar fire case granted bail

आरोपींमध्ये एक वैद्यकीय अधिकारी व तीन परिचारिका यांचा समावेश आहे. वैद्यकीय अधिकारी विशाखा शिंदे, परिचारिका सपना पठारे, आस्मा शेख आणि चन्ना आनंत यांना अटक करण्यात आली होती. राज्याच्या आरोग्य विभागाने यातील शिंदे आणि पठारे यांना निलंबित तर शेख आणि चंन्नाआनंत यांचा सेवा समाप्ती करण्याचा आदेश दिला होता. या अग्निकांड प्रकरणाची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली असून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्यासह सहा जणांवर कारवाई करण्यात आली होती. मात्र डॉक्टरांच्या व परिचारिकांच्या संघटनांच्या आंदोलनामुळे यातील डॉ. विशाखा शिंदे यांचे निलंबन आरोग्य विभागाने मागे घेतले आहे.

अहमदनगर जिल्हा रुग्णालय
नगर अग्निकांड : त्या डॉक्टरचे निलंबन मागे तरीही कोठडीत रवानगी

अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयात लागलेल्या आग आणि बारा रुग्ण मृत्यू प्रकरणी सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या एक डॉक्टर आणि तीन परिचारिकांना आज अहमदनगर जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 25 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर या चौघांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्याचबरोबर न्यायालयाने जामीन मंजूर करताना या चारही जणांवर काही अटी आणि शर्ती ठेवलेले आहेत. आरोपींना तपासात सहकार्य करण्यास न्यायालयाने सांगितले आहे.

अहमदनगर जिल्हा रुग्णालय
...तर नगर जिल्हा रुग्णालयातील ११ जणांचा जीव वाचला असता!

डॉक्टर विशाखा शिंदे यांच्यासह दोन परिचारिका आणि एक परिचारक यांना जामीन मंजूर झाल्याने परिचारिका संघटना, डॉक्टर संघटना यांनी समाधान व्यक्त केले आहे. जिल्हा शल्यचिकित्सक सुनील पोखरणा यांना आधीच न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर झालेला आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in