राष्ट्रवादी युवकचे माजी प्रदेशाध्यक्ष काँग्रेसच्या वळणावर

अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा ( NCP ) आणखी एक मोठे तरूण नेते काँग्रेसमध्ये ( Congress ) प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत.
राष्ट्रवादी युवकचे माजी प्रदेशाध्यक्ष काँग्रेसच्या वळणावर

संग्राम कोते व बाळासाहेब थोरात

सरकारनामा

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा ( NCP ) आणखी एक मोठे तरूण नेते काँग्रेसमध्ये ( Congress ) प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे हा पक्ष प्रवेश आगामी राजकीय गणिते बदलाची चाहूल असल्याचे समजले जात आहे. Former State President of NCP Youth on the turn of Congress

राष्ट्रवादी युवकचे माजी प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते सध्या काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ते निकटवर्तीय समजले जातात. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे ते भाचे आहेत. अलीकडच्या काळात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी त्यांच्या वाढलेल्या भेटीगाठी व साईबाबा संस्थानच्या उपाध्यक्षपदाची न मिळालेली संधी यामुळे असे कास लावले जात आहेत. त्यांच्या निकटवर्तीयांकडून या चर्चेला दुजोराही मिळत आहे.

संग्राम कोते व बाळासाहेब थोरात

साईसंस्थानच्या अध्यक्षपदाबाबत राष्ट्रवादीचे संग्राम कोते नाराज आहेत का?

कोते मागील 17 वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठेने काम करत आहेत. पक्षाच्या अत्यंत आव्हानात्मक काळात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस व युवक काँग्रेस अत्यंत समर्थपणे त्यांनी महाराष्ट्रात सांभाळली. आर. आर. पाटील यांच्यानंतर संग्राम कोते पाटील यांच्या कामाचे शरद पवार यांनी जाहीर राज्यव्यापी बैठकीत कौतुक केले होते. राष्ट्रवादी विद्यार्थी व युवकसाठी राज्यभर शंभराहून मोर्चे, दीडशेहून अधिक मतदारसंघात बुथ कमिटी बैठका, राज्याचे सात दौरे सर्व विभागीय मेळावे, 1700 नव्या शाखांची स्थापना आदी कार्यक्रमांचे त्यांनी तरुणांत राष्ट्रवादीची पक्ष बांधणी केली होती. मणक्याच्या त्रासामुळे त्यांनी फेब्रुवारी 2019 मध्ये राजीनामा दिला होता.

संग्राम कोते व बाळासाहेब थोरात

संग्राम कामाला लाग ! अजितदादांचा कोते पाटील यांना आदेश

पक्षाची सत्ता आल्यानंतर साईबाबा संस्थानचे उपाध्यक्ष पदासाठी इच्छुक होते. अजित पवार यांनी त्यासाठी प्रयत्न देखील केले मात्र शिवसेना उपाध्यक्षपद देण्यात राजी होऊ शकली नाही. तेव्हापासून कोते नाराज असल्याचे कळते. पक्ष त्यांना विश्वस्तपद द्यायला तयार होतं पण विश्वस्त पदासाठी त्यांना नकार कळवला. उपाध्यक्षपदी संधी न मिळाल्याने पक्षाच्या कार्यक्रमापासून कोते दूर गेल्याचे कळते. अलीकडच्या कालावधीमध्ये बाळासाहेब थोरात यांनी दोनदा संग्राम कोते यांच्या घरी भेट दिली तसेच कोते ही वेळोवेळी बाळासाहेब थोरात यांच्या संपर्कात असल्याचे समजते.

संग्राम कोते व बाळासाहेब थोरात

सत्यजित तांबे-संग्राम कोते : नगर जिल्ह्यातील दोन मावसभावांकडे दोन्ही काॅंग्रेसचे युवा नेतृत्त्व

कोते काँग्रेसमध्ये गेल्यास काँग्रेसचे एक चांगला नवा चेहरा मिळणार आहे. यात पक्ष प्रवेशामुळे कोते यांना मोठा राजकीय फायदाही होण्याची शक्यता आहे. शिर्डी (राहाता) विधानसभा मतदार संघ महाविकास आघाडीत काँग्रेसकडे आहे. राधाकृष्ण विखे पाटील भाजपमध्ये गेल्यापासून या जागेवर काँग्रेसलाही एक सक्षम उमेदवाराची अवश्यकता आहे. कोते पक्षात दाखल झाल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत विखे विरूद्ध कोते अशी लढत पहायला मिळू शकते. शिवाय शिर्डी नगरपंचायतची नगरपरिषद झाल्यावर निवडणूक होणार आहे. निवडणूकही काँग्रेसला फायदेशीर ठरू शकते, अशी जिल्हाभर चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.