श्रीकांत देशमुखांना कोर्टाचा दणका! अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळाला..आता एकच पर्याय उरला

Shrikant Deshmukh : लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेवर अत्याचार केल्याच्या आरोप देशमुख यांच्यावर आहे.
Shrikant Deshmukh Latest News
Shrikant Deshmukh Latest NewsSarkarnama

सोलापूर : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार केल्याच्या आरोपात सोलापूर भाजपचे (BJP) माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख (Shrikant Deshmukh) यांचा अटकपूर्व जामीन अर्ज (Bail application) सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाने आज (ता.२४ ऑगस्ट) फेटाळला आहे. (Shrikant Deshmukh Latest News)

Shrikant Deshmukh Latest News
विधानसभेला कनिष्ठ सभागृह म्हणून हिणवू नका ; मुनगंटिवार परबांवर संतापले..

लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेवर अत्याचार केल्याच्या आरोप देशमुख यांच्यावर असून याबाबत गुन्हा दाखल आहे. याच प्रकरणात अटकेपासून वाचण्यासाठी देशमुख यांनी सोलापूर न्यायालयात दाद मागितली होती. मात्र आज झालेल्या सुनावणीत देशमुखांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. यामुळे देशमुखांना हा मोठा दणका मानला जात आहे.

Shrikant Deshmukh Latest News
अमोल मिटकरींनी माकडचाळे केले नसते तर...

आरोपी हा राजकीय पक्षाशी संबंधित असून पळून जाण्याची शक्यता आहे, याबरोबरच पुरावे नष्ट करण्याची शक्यता असल्याचा युक्तिवाद सरकारी पक्षातर्फे करण्यात आला. न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरत देशमुख यांचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला. मात्र उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी त्यांच्याकडे दोन दिवसाची संधीही आहे. 26 तारखेपर्यंत जर उच्च न्यायालयाचे आदेश न आणल्यास आरोपीला अटक होऊ शकते, अशी माहिती जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत यांनी दिली आहे.

दरम्यान, एका महिलेनं देशमुख यांच्या विरोधात अत्याचाराची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी देशमुखांवर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी अटकेपासून सुरक्षा मिळावी यासाठी त्यांनी सोलापूर जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. मात्र आज जिल्हा न्यायालयाने 5 प्रमुख मुद्द्यांवर हा अर्ज फेटाळला आहे. आता देशमुख 26 तारखेपर्यंत उच्च न्यायालयात दाद मागतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com