शिवसेनेच्या माजी पंचायत समिती सदस्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

शिवसेनेचे ( Shivsena ) नेते तथा नगर तालुका पंचायत समितीचे माजी सदस्य गोविंद मोकाटे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.
शिवसेना
शिवसेनासरकारनामा

अहमदनगर : नगर तालुक्यातील शिवसेनेचे ( Shivsena ) नेते तथा नगर तालुका पंचायत समितीचे माजी सदस्य गोविंद मोकाटे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. Former Shivsena Panchayat Samiti member charged with rape

अहमदनगर शहरातील एका उपनगरात राहणाऱ्या विवाहित महिलेने तोफखाना पोलिस ठाण्यात आज हा गुन्हा दाखल केला. त्यामुळे नगर शहर व तालुक्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, गोविंद मोकाटेने विवाहित महिलेला 2018मध्ये फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली होती. तसेच ओळख वाढविण्याचा प्रयत्न केला. मात्र पीडित महिलेने ही फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली नाही. पीडितेने तीन वेळा फ्रेंड रिक्वेस्ट नाकारली. त्यानंतरही मोकटेने पीडितेला फेसबुक द्वारे अश्लिल मेसेज पाठविले. याच वर्षीच्या मे ते जून दरम्यान पीडितेच्या मोबाईलवर मोकाटेने फोन केला. पीडितेच्या नवऱ्याकडे कामा निमित्त येणार असल्याचे सांगितले.

शिवसेना
भाग्यश्री मोकाटे यांना उद्धव ठाकरे कसा न्याय देणार?

एक दिवस मोकाटे पीडितेच्या घरी येऊन तिच्या पतीला भेटूनही गेला. पीडितेला सोशल मीडियावरून आपले अफेअर असल्याचे तुझ्या पतीला सांगेल, मुलांचा खून करेल अशी धमकी देत वेळोवेळी बलात्कार केला. या प्रकाराला कंटाळून पीडितेने या प्रकाराची व्हिडिओ शुटिंग तयार केली. हा व्हिडिओही पीडितेने पोलिसांना दिली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.

शिवसेना
अक्षय कर्डिलेंची मोठी घोषणा : राजकारणाचा नवा डाव ठरला

अहमदनगर जिल्हा परिषदेची निवडणूक मार्च 2022ला होणार आहे. त्या दृष्टीने राजकीय हलचालींना वेग आला आहे. अशातच हा प्रकार घडल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. गोविंद मोकाटेवर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. 2012 ते 2017 या कालावधित गोविंद मोकाटे नगर तालुका पंचायत समितीत शिवसेनेकडून सदस्य होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com