माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटलांनी घेतले बाळूमामांचे दर्शन

सुमारे सव्वा तास त्या मंदिरात थांबल्या होत्या.
Pratibhatai Patil
Pratibhatai Patil Sarkarnama

सेनापती कापशी (जि. कोल्हापूर) : कागल तालुक्यातील मेतके येथील बाळूमामा मंदिराला माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील व त्यांचे पती देवीसिंह शेखावत यांनी सोमवारी (ता. ८ नोव्हेंबर) दुपारी साडेबारा वाजता भेट दिली. मूळक्षेत्र मेतके येथील बाळूमामा मंदिरासाठीचा हा ऐतिहासिक क्षण साठवून ठेवण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. दर्शन आणि आरती झाल्यानंतर त्यांनी मंदिराचा इतिहास जाणून घेतला. सुमारे सव्वा तास त्या मंदिरात थांबल्या होत्या. त्यानंतर भक्तांसाठी मंदिर खुले केले. (Former President Pratibhatai Patil took darshan Balumama)

माजी राष्ट्रपती मंदिराला भेट देणार असल्याने सुरक्षेच्या कारणावरून रविवारपासून (ता. ७ नोव्हेंबर) भक्तांना प्रवेश बंद करुन बाहेरुन दर्शनाला परवानगी दिली होती. आज दुपारी साडेबाराच्या सुमारास श्रीमती प्रतिभाताई पाटील, शेखावत यांनी मंदिरात प्रवेश केला. येथे बाळूमामांच्या पादुका, गादी आणि मूर्तीचे दर्शन घेऊन त्यानी आरतीमध्ये सहभाग घेतला. या मंदिराची १९३२ मध्ये झालेली स्थापना, पहिला भंडारा उत्सव आणि स्वतः बाळूमामांनी त्यावेळी लिहिलेला खर्च व हिशेबाची पोतडी त्यांनी जवळून पाहिली.

Pratibhatai Patil
महादेवराव महाडिकांच्या राजकारणाची सुरुवात झालेल्या संस्थेत गटबाजी : अध्यक्षांचा राजीनामा

बाळूमामा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष पापा पाटील कौलवकर, विश्वस्थ दयानंद पाटील, राजेंद्र पाटील, बाबासाहेब पाटील, बळीराम मगर आणि मंदिर उभारणीत योगदान दिलेल्या श्रीमती आकाताई पाटील यांच्याकडून त्यानी मंदिराबद्दल माहिती घेतली. ट्रस्टच्या वतीने त्यांना बाळूमामांची प्रतिमा, घोंगडी व ओटीसह कोल्हापरी फेटा बांधून सन्मानित करण्यात आले. हा क्षण डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी नागरिकांनी मंदिराबाहेर मोठी गर्दी केली.

Pratibhatai Patil
अजित पवारांनी सोमेश्वर कारखान्याची धुरा सोपवली दोन वर्गमित्रांवर!

ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच आकाताई पाटील यांनी आणि खासदार संजय मंडलिक यांच्या वतीने हमिदवाडा साखर कारखान्याचे संचालक ॲड. वीरेंद्र मंडलिक यांनी स्वागत केले. तहसीलदार शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी सुशीलकुमार संसारे, सहायक पोलिस निरीक्षक विकास बडवे आदी या वेळी उपस्थित होते.

Pratibhatai Patil
मुख्यमंत्री ठाकरे ज्यांना विसरले ते निघाले पंतप्रधान मोदींचे मित्र!

खड्डेमय प्रवास....

दरम्यान, हायब्रीड पद्धतीने प्रायोगिक तत्वावर दोन वर्षांपूर्वी करण्यास घेतलेला देवगड-निपाणी राज्यमार्ग आजही मरणयातना भोगतोय. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा बाळूमामा देवदर्शनासाठी आज मुदाळतिट्टा-आदमापूर ते हमिदवाडा-मेतके असा प्रवास आज झाला. त्यांच्या ताफ्यातील गाड्याचा प्रवास या रस्त्यावरील खड्डयातूनच झाला, त्यामुळे त्यांनीही या निमित्ताने खड्डेमय प्रवासाचा अनुभव घेता आला.

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील ह्या कालपासून कोल्हापूर दौऱ्यावर आल्या आहेत.आज सकाळी त्यांनी आदमापूर येथील श्रीक्षेत्र बाळूमामा देवालयास भेट दिली.तिथे बाळूमामांच्या समाधीचे सहकुटुंब दर्शन घेतले. त्यानंतर त्यांच्या गाड्यांचा ताफा मुळक्षेत्र मेतके गावाच्या दिशेने रवाना झाला. आदमापूर येथील उड्डाणपूलापासून पुढे कुरुकलीपर्यंत रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com