राष्ट्रवादीत वाद पेटला : कल्याणराव काळेंकडून माजी तालुकाध्यक्षांचे कारखान्याचे सभासदत्व रद्द

पंढरपूर राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष दीपक पवारांचे सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे सभासदत्व रद्द
Deepak Pawar-Kalyanrao Kale
Deepak Pawar-Kalyanrao KaleSarkarnama

पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी (ता. ५ एप्रिल) ऑनलाईन पार पडली. या सभेत कारखान्याचे माजी संचालक व राष्ट्रवादी काॅंग्रेसचे (ncp) माजी तालुकाध्यक्ष ॲड. दीपक पवार यांचे सभासदत्व रद्द करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. दरम्यान, सभेत मंजूर केलेल्या ठरावाच्या विरोधात सोलापूरच्या साखर सहसंचालकांच्या न्यायालयात दाद मागणार असल्याचे पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. (Former president of Pandharpur NCP Deepak Pawar's factory membership canceled)

कारखान्याची आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकीय सूडबुद्धीने सभासदत्व रद्द केले आहे. परंतु एका दीपक पवारचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला गेला असला, तरी माझ्यासारखे अनेक दीपक हे कल्याणराव काळे (Kalyanrao Kale) यांच्या विरोधात लढण्यासाठी तयार झाले आहेत. कारखान्याच्या तक्रारींबाबत दूध का दूध आणि पाणी का पाणी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे स्पष्ट करत, ऑनलाईन घेण्यात आलेली सर्वसाधारण सभा बेकायदेशीर असून ती रद्द करावी अशी मागणीही पवार यांनी केली आहे. सभासदत्व रद्द केल्यामुळे पवार-काळे यांच्यातील राजकीय संघर्ष आणखी टोकाला गेला आहे.

Deepak Pawar-Kalyanrao Kale
राष्ट्रवादीच्या कल्याणराव काळेंच्या दारात ईडी : पक्षाच्याच माजी पदाधिकाऱ्याची तक्रार

भाळवणी येथील वसंतराव काळे आणि खर्डी येथील सीताराम महाराज या दोन साखर कारखान्यासंदर्भात ॲड. दीपक पवार आणि कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांच्यात मागील काही वर्षांपासून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. सीताराम महाराज साखर कारखान्यासंदर्भात पवार यांनी काळे यांच्याविरोधात थेट ईडीकडे तक्रार दिली आहे. तेव्हापासून काळे आणि पवार यांच्यातील मतभेद टोकाला गेले आहेत. त्यानंतरही ॲड. पवार यांनी वसंतराव काळे साखर कारखान्याच्या संदर्भातील वेगवेगळी माहिती मिळावी, अशी लेखी मागणी साखर आयुक्त, साखर सहसंचालक, राज्य सहकारी बॅंकेकडे केली आहे. त्यामुळे काळे-पवार यांच्यातील मतभेद आणखीनच वाढले आहेत. त्यातूनच कारखान्याची बदनामी करून नुकसान केल्याचा ठपका ठेवत कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे व त्यांच्या संचालक मंडळाने ॲड पवार यांचे सभासदत्व रद्द केले आहे. या प्रकारामुळे सोलापूर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखानदारीत मोठी खळबळ उडाली आहे.

Deepak Pawar-Kalyanrao Kale
राजू शेट्टी तासाभरात घेणार मोठा निर्णय

याबाबत दीपक पवार म्हणाले की, कल्याणराव काळे यांनी कारखान्याच्या सभासदांच्या हक्कावर एक प्रकारे गदा आणून अन्याय केला आहे. या निर्णयाचा त्यांना आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल. कोणतेही सबळ कारण नसताना केवळ राजकीय सूडबुध्दीने माझे सभासदत्व रद्द केले आहे. परंतु मला न्याय मिळेल यावर माझा विश्वास आहे. माझ्या पत्रव्यवहारामुळे व तक्रारींमुळे कारखान्याचे नुकसान झाले, असे सांगणे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत, असा टोलाही काळेंना लगावला.

Deepak Pawar-Kalyanrao Kale
भाजप नेते डॉ. अनिल बोंडे यांना तीन महिने कारावासाची शिक्षा...

कारखान्यात सुरु असलेले गैरप्रकार समोर येऊ नयेत, यासाठीच माझे सभासदत्व रद्द केले आहे. पण, या निर्णयाविरोधात मी साखर सहसंचालक, साखर आयुक्त आणि सहकार मंत्र्यांकडे दाद मागणार आहे. प्रसंगी न्यायालयात देखील जाण्याची माझी तयारी आहे. शेवटपर्यंत लढून सत्य बाहेर काढूणार असल्याचेही या वेळी पवार यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com