राजू शेट्टी यांनी दिशा केली स्पष्ट : आता कोणाच्याही वळचणीला जाणार नाही...

माजी खासदार राजू शेट्टी (Mahavikas Aghadi) यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली
Swabhimani Sanghtana, Raju Shetty
Swabhimani Sanghtana, Raju ShettySarkarnama

भिलवडी : शेतकऱ्यांवर अन्याय करणारी धोरणे राबवत असल्यानेच स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Sanghatana) महाविकास आघाडीतून (Mahavikas Aghadi) बाहेर पडली. यापुढे कोणाच्या वळचणीला जाणार नाही, असे माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी स्पष्ट केले. नेत्र शिबीराच्या उद्घाटनासाठी ते आले होते.

Swabhimani Sanghtana, Raju Shetty
चार दिवसांनी प्रगटलेले सोमय्या म्हणाले, होमवर्क करण्यासाठी भूमिगत झालो होतो

यावेळी शेट्टी म्हणाले, ''शेतकऱ्यांच्या हितासाठी आघाडीत सामिल झालो होतो. शेतकरी हिताच्या भूमी अधिग्रहण कायद्यात मोडतोड करून सरकारने अन्याय केला. महापूर व अतिवृष्टीच्या नुकसानीची तुटपुंजी मदत देत अपमान केला. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान दिले नाही, असा आरोप त्यांनी केला. सहकार कायद्यात बदल करीत बाजार समितीला मतदान करण्याचा शेतकऱ्यांना असलेला अधिकार काढून घेत ग्रामपंचायत व सोसायटीच्या सदस्यांना दिला, असेही शेट्टी म्हणाले.

सांगलीच्या दत्त इंडिया साखर कारखान्याच्या ऊसबीलातुन मायनर इरिगेशनच्या वसुलीबाबत इशारा देताना शेट्टी म्हणाले, "ही वसुली चुकीची आहे. त्यासाठी शेतकऱ्यांची लेखी संमती घेतली नाही. दत्त इंडियाने कपातीची रक्कम ऊस उत्पादकास परत करावी, अन्यथा त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे गुन्हे दाखल करु, असा इशाराही त्यानी दिला.

Swabhimani Sanghtana, Raju Shetty
एनसीबीवर नामुष्की! आर्यन खान प्रकरणातील दोन वरिष्ठ अधिकारी निलंबित

''सरकारच्या शेतकऱ्यांवरील अन्यायाबाबत सतत सुचना आम्ही करीत होतो. मात्र, ऐकले जात नव्हते. एकरकमी एफआरपीची मोडतोड सरकारने केली. महाविकास आघाडीतुन बाहेर पडण्याचा निर्णय यापुर्वीच घेणार होतो, कोरोनामुळे विलंब झाला अन्यथा सरकारने अपयशाचे खापर आमच्यावर फोडले असते, असेही ते म्हणाले. अन्याय होत असल्यानेच संबंध तोडले. संघटनेचा स्वकर्तृत्वावरच आमचा विश्वास आहे. यापुढे सर्व स्थानिक स्वराज संस्था, विधानसभा निवडणुका स्वबळावर लढणार आहे. यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत मोरे, कार्याध्यक्ष संदीप राजोबा, धन्यकुमार पाटील, बाळासो मगदुम व कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com