एकरकमी ‘एफआरपी’साठी राजू शेट्टी आक्रमक : जेजुरीतून खंडोबा दर्शनाने एल्गार!

जयसिंगपूर येथे १९ ऑक्टोबर रोजी २० व्या ऊस परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे
एकरकमी ‘एफआरपी’साठी राजू शेट्टी आक्रमक : जेजुरीतून खंडोबा दर्शनाने एल्गार!
Raju ShettiSarkarnama

जेजुरी (जि. पुणे) : उसाला एकरक्कमी एफआरपी मिळावी, यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत. ‘जागर एफआरपीचा, आराधना शक्तीपीठीची' या अंतर्गत महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षत्रांना भेटी देत ते शेतकऱ्यांशी ‘एफआरपी’बाबत संवाद साधत आहेत. आज ते जेजुरीत कुलदैवत खंडोबाच्या दर्शनासाठी आले होेते. त्यावेळी त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळावी, यासाठी जयसिंगपूर येथे १९ ऑक्टोबर रोजी २० व्या ऊस परिषदेचे आयोजन केले जाणार आहे, असे सांगितले. (Former MP Raju Shetty aggressive for one time sugarcane FRP)

‘एफआरपी’ बाबत राज्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी राजू शेट्टी हे महाराष्ट्रभर फिरत आहेत. ते आज जेजुरीत आले होेते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, ‘एफआरपी’चे तुकडे करण्यास शेतकऱ्यांचा विरोध आहे. केंद्र सरकारने नेमलेल्या नीती आयोगाच्या अभ्यासात एफआरपीचे तीन तुकडे करण्यात आले आहेत. राज्य सरकारकडून मागविलेल्या सूचनांमध्ये एफआरपीचे तुकडे केले आहेत. तुकडे केल्याने शेतकऱ्यांना फायदा होणार नाही. केवळ कारखान्यांचा विचार करून हे धोरण ठरविले जात आहे. स्वाभीमानी शेतकरी संघटेचा अशा धोरणाला विरोध असल्याचे शेट्टी यांनी या वेळी सांगितले.

Raju Shetti
अजितदादांची विक्रमी कामगिरी : ‘सोमेश्वर’मध्ये राष्ट्रवादीचे सहा जण १६ हजारांच्या फरकाने विजयी

शेतकरी उसासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करतात. शेतकऱ्यांच्या वापरलेल्या पैशाच्या व्याजाचा विचार केला पाहिजे. तुकडयाने पैसे मिळाले, तर शेतकरी कर्ज फेडू शकणार नाही. कारखाना हितासाठी शेतकऱ्यांवर अन्याय होता कामा नये. राज्य सरकारनेही नीती आयोगाप्रमाणे एफआरपीचे तुकडे करण्याचा अहवाल पाठविला आहे. दोन हजार अकरानंतर एकही कारखाना पडला नाही, त्यामुळे कारखान्यांच्या हिताबरोबर शेतकऱ्यांचे हीतही सरकारने पाहिले पाहिजे. एफआरपीचे होणारे तुकडे रोखण्यासाठी व सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जयसिंगपूर येथे ऊस परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे, त्यामध्ये याबाबत आवाज उठविला जाईल. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर शेतकऱ्यांना एफआरपीचे तुकडे मान्य नाहीत. नीती आयोगाने एकांगी फक्त कारखान्यांचा विचार करू नये, असे शेट्टी यांनी सांगितले.

Raju Shetti
‘आदिनाथ’साठी बबनदादांचा मुलगाही मैदानात : बारामती ॲग्रोला अडचण असेल तर आम्ही महिन्यात सुरू करू

पंढरपूर येथून सुरु केलेल्या एफआरपी जागर यात्रेची उद्या (ता. १५ ऑक्टोबर) फलटण येथे सांगता होणार आहे. कोल्हापूर, सोलापूर, सांगली, लातूर, नगर, जालना, बीड, पुणे, सातारा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी या निमित्ताने संवाद साधत शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्याचे काम सुरु केले असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. एफआरपीच्या होणाऱ्यांना तुकडयांना विरोध करण्यासाठी केंद्र, राज्य व कारखानदार यांच्याशी संघर्ष केला जाईल, असे त्यांनी या वेळी सांगितले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in