तीनदा विनंती करूनही दिलीप मानेंनी सभापतिपदाबाबतचा शब्द फिरवला!

सीना नदीकाठी भरला माने विरोधकांचा मेळा; लोकांनी सहकार्य केल्यास आपण या भागाकडे निश्‍चितपणे चांगले लक्ष देऊ, असेही साठे यांनी सांगितले.
Baliram Sathe
Baliram SatheSarkarnama

उत्तर सोलापूर : उत्तर सोलापूर तालुका पंचायत समितीचे सभापतीपद भाजपकडून काढून घेण्यासंदर्भात माझे आणि माजी आमदार दिलीप माने यांचे बोलणे झाले होते. पहिल्यांदा रजनी भडकुंबे यांना सभापती करण्याचे ठरले. त्यानंतर हरिदास शिंदे यांना सभापती करण्याचा शब्द माने यांनी दिला होता. मात्र तो शब्द त्यांनी फिरविला, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे (ncp) जिल्हाध्यक्ष बळीराम साठे (Baliram Sathe) यांनी आज बेलाटी (ता. उत्तर सोलापूर) येथे बोलताना केला. (Former MLA Dilip Mane changed word about the post of sabhapati : Baliram Sathe)

उत्तर सोलापूर तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी शालिवाहन माने-देशमुख यांची निवड झाल्याबद्दल बेलाटी येथे त्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना साठे हे बोलत होते.

Baliram Sathe
भगिरथ भालकेंना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही : राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याची ग्वाही

साठे म्हणाले की, उत्तर सोलापूर पंचायत समितीचे सभापतीपद भाजपकडून काढून घेण्यासंदर्भात माझी व माने यांच्यात बैठक झाली. त्यानंतर तीन वेळा मी माने यांना विनंती करून शिंदे यांना सभापती करण्याचा आग्रह धरला. मात्र तरीही माने यांनी शिंदे यांना सभापती करण्यास नकार दिला. त्यामुळे शिंदे यांची सभापती होण्याची संधी हुकली आहे. सीना नदीकाठच्या भागातील लोकांनी मागील पन्नास वर्षांत मोठ्या प्रमाणात अन्याय सहन केला आहे. मात्र, आता तो अन्याय सहन करण्याची गरज नाही. लोकांनी सहकार्य केल्यास आपण या भागाकडे निश्‍चितपणे चांगले लक्ष देऊ. या भागात आमदार यशवंत माने यांच्या माध्यमातून निधी मिळवून देण्याचा प्रयत्न सुरूच केला असल्याचेही त्यांनी सांगितले.

Baliram Sathe
पुण्याचे बाजीराव गिरीश बापटच : बापट म्हणतात ‘...मग माझी मस्तानी कुठाय!’

सीना नदीकाठी माने विरोधक आले एकत्र

उत्तर सोलापूर तालुका काँग्रेस अध्यक्षपदी शालिवाहन माने-देशमुख यांची निवड झाल्याबद्दल सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मात्र, सत्काराच्या या कार्यक्रमाला माने गट वगळता तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. त्यामुळे सीना नदीकाठी दिलीप माने यांचे सर्व विरोधक एकत्र आल्याचे चित्र आजच्या या बैठकीत पाहायला मिळाले.

Baliram Sathe
कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या विशाल फटेच्या लॉकरमध्ये दमडीही नाही!

कार्यक्रमासाठी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष सिद्राम सलवदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रल्हाद काशीद, पंचायत समितीचे सदस्य हरिदास शिंदे, पप्पू सुतार, शिवाजी ननवरे, मोहन लांबतुरे, धनाजी भोसले, नागेश पवार, कल्याण काळे, दयानंद शिंदे, बापू साठे, प्रकाश गुरव, गणेश पाटील, शिवनीचे सरपंच प्रशांत राखे, युवक काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष सचिन गुंड, शिवसेनेचे संजय पौळ, पांडुरंग पवार, वजीर शेख, राजाराम कोलते, इलाही पटेल, महादेव जन्मले, जयहिंद शुगरचे कार्यकारी संचालक बब्रुवाहन माने-देशमुख आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com