Wai NCP News : माजी मंत्री कै. मदनराव पिसाळांचा नातू शरद पवारांसोबत...

Sharad Pawar ॲड.विजयसिंह पिसाळ यांनी आज पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, आमचे आजोबा कै. मदनराव पिसाळ हे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून खासदार शरद पवार यांच्यासोबत होते.
Sharad Pawar, Vijaysinh Pisal
Sharad Pawar, Vijaysinh Pisalsarkarnama

-भद्रेश भाटे

Wai NCP News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर वाई तालुक्यातील माजी मंत्री कै. मदनराव पिसाळ यांचा नातू ॲड.विजयसिंह उर्फ भैय्यासाहेब पिसाळ यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा घेतला निर्णय आहे. मागील आठवड्या राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांच्यासमवेत, त्यांचे वडील तालुका सूतगिरणीचे अध्यक्ष शशिकांत पिसाळ हे अजित पवारांसोबत गेले होते. याबाबत ॲड. विजयसिंह पिसाळ म्हणाले, आम्ही तत्वांशी व निष्ठेशी कधीही तडजोड करू शकत नाही. त्यामुळे आम्ही शरद पवारांसोबत, कै.मदनआप्पांनी आणि कै. लक्ष्मणरावतात्यांनी दाखवलेल्या वाटेवरच वाटचाल करणार आहोत.

ॲड.विजयसिंह उर्फ भैय्यासाहेब पिसाळ यांनी आज पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. श्री.पिसाळ म्हणाले,आमचे आजोबा कै. मदनराव पिसाळ Madanrao Pisal हे राष्ट्रवादीच्या स्थापने पूर्वीपासून खासदार शरद पवार Sharad Pawar यांच्यासोबत होते. पवार साहेबांनी आमच्या कुटुंबावर तसेच कै.मदनआप्पांच्या माध्यमातून वाई - खंडाळा Wai Khandala तालुक्यावर भरभरून प्रेम करून मोठी ताकद दिली. कै.

कै. आप्पांनी पवार साहेबाच्या मार्गदर्शनाखालीच सलग वीस वर्षे विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. त्यांची निष्ठा पाहून साहेबांनी त्यांना सहकार आणि पणन मंत्री केले. या कालावधीत स्व.आप्पांनी नागेवाडी धरण तसेच तालुका सहकारी सूतगिरणीची उभारणी केली.यामुळे बावधन आणि आसपासच्या गावातील जमीन ओलीताखाली आली. सूतगिरणीमुळे युवकांना रोजगार मिळाले.

बलकवडी धरणाच्या माध्यमातून खंडाळा तालुका सुजलाम सुफलाम करण्यात महत्वाची भूमिका निभावली.आप्पांच्या माघारी साहेबांनी वडीलकीचा हात आमच्या कुंटुबाच्या डोक्यावर कायम ठेऊन सौ.अरुणादेवी पिसाळ यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद देण्याची किमया केली.मागील ५० वर्षाचा राजकारण आणि समाजकारणाचा आढावा घेतला याचा आढावा घेतला असता पिसाळ कुंटुंबिय हे सदैव पक्षाच्या ध्येय धोरणांसोबत राहिले आहे.

Sharad Pawar, Vijaysinh Pisal
Wai News : 'किसन वीर'ला मदत मिळू नये म्हणणारे आता कारखाना वाचवण्यासाठी अजितदादांसोबत : मदन भोसले

२००४ साली काही लोकांच्या अंतर्गत राजकीय कुरघोडींमुळे आप्पांना निवडणूकीत तिकिट डावलले गेले.तेव्हाही कै.आप्पांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा जनमानसांचा रेटा असताना पक्षादेश अंतिम मानून पक्षा सोबतच राहण्याचा निर्णय घेतला. विधानसभा २०१४- २०१९ साली मोदी लाट असताना अनेक पक्षाच्या ऑफर असताना देखील आमचे कुंटुबिय हे पवारसाहेबा सोबत निष्ठेने उभे राहिले.

मध्यंतरीच्या काळात युवक जिल्हा अध्यक्षच्या निवडणुका पार पडल्या माझी निवड निश्चित असताना असताना सुद्धा काही लोकांच्या राजकीय आकसामुळे मला जाणीवपूर्वक डावलण्यात आले.परंतु, कोणतीही नाराजी न व्यक्त करता,कोणत्याही पदाची अपेक्षा न बाळगता गेले सात ते आठ वर्षे 'विजयसिंह पिसाळ युवा मंच'च्या माध्यमातून पक्षाची ध्येयधोरणे तालुक्यात राबवित गेलो. आमच्या कुंटुबाने कधीही सत्तेसाठी राजकारण किंवा निष्ठेशी तडजोड केली नाही.

Sharad Pawar, Vijaysinh Pisal
Satara NCP News : भाजपचा सैतान सदाभाऊंमध्ये शिरलाय…शशिकांत शिंदे भडकले

जिल्ह्याचे राजकारण हे यशवंत विचारांचे असून, या विचारांपासून आम्ही दूर जाऊ शकत नाही. तत्वांशी व निष्ठेशी कधीही तडजोड करू शकत नाही. त्यामुळे आम्ही शरद पवारांसोबत, कै.मदनआप्पांनी आणि कै. लक्ष्मणतात्यांनी दाखवलेल्या वाटेवरच वाटचाल करणार आहोत. येणाऱ्या काळात सर्व युवक कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन मतदार संघातील घराघरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि पवार साहेबांचे विचार पोहोचवणार आहोत. वडील शशिकांत पिसाळ यांनी यापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला असून आई सौ. अरुणादेवी पिसाळ या तीन - चार वर्षापासून राजकारणापासून अलिप्त असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com