सोलापुरात ठाकरेंना धक्का : माजी मंत्री दिलीप सोपलांचा शिवसेनेचे पद स्वीकारण्यास नकार

माझ्याबरोबरच्या सहकाऱ्यांनी माझ्यासाठी तीन-तीन पिढ्या काम केलेले आहे.
Uddhav Thackeray-Dilip Sopal
Uddhav Thackeray-Dilip SopalSarkarnama

सोलापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या बंडानंतर फूट पडलेल्या शिवसेनेची (Shivsena उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुनर्बांधणी करण्याचे काम पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हाती घेतले आहे. त्यातून पक्षात नव्या नियुक्त्या, खांदेपालट करण्यात येत आहे. सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये खांदेपालट करण्यात आली आहे. त्यानुसार माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते दिलीप सोपल (Dilip Sopal) यांच्यावर माढा लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवली आहे. मात्र, सोपल यांनी पद घेण्यास नकार दिला आहे. पदाशिवाय शिवसेनेत आपले काम सुरू आहे, असे त्यांनी म्हटले आहे, त्यामुळे सोलापूरच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. (Former Minister Dilip Sopal's refusal to accept Shiv Sena post)

दिलीप सोपल पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राहिले आहेत. त्यांना पक्षाने कॅबिनेट मंत्री आणि सोलापूरच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिली होती. विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राष्ट्रवादीला रामराम करत शिवबंधन हाती बांधले होते. मात्र, विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. तेव्हापासून ते शिवसेनेत काहीसे अडगळीत पडले होते. नव्या पक्षात ते रुळले नसल्याची चर्चा होती. वर्ष-दीड वर्षाभरापूर्वी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी बार्शीत जाऊन सोपलांची विचारपूस केली होती. त्यामुळे ते राष्ट्रवादीत परततील अशीही चर्चा रंगली हेाती.

Uddhav Thackeray-Dilip Sopal
हिमाचल जिंकणाऱ्या काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपदासाठी ‘या’ मायलेकासह पाच नावे आघाडीवर!

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोपल यांच्यावर माढा लोकसभा मतदारसंघाच्या संघटक पदाची जबाबदारी टाकली होती. मात्र, त्यांनी ते जबाबदारी स्वीकारण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. याबाबत सोपल म्हणाले की, शिवसेनेतच आपले पदाशिवाय काम सुरू आहे. राजकरणापेक्षा सामाजिक कार्यात मी रमलो आहे. माझ्यावर कॅन्सर हॉस्पिटलची जबाबदारी आहे. कॅन्सर हॉस्पिटलसाठी आम्ही सध्या देणगीदार शोधत आहोत. माझ्याबरोबरच्या सहकाऱ्यांनी माझ्यासाठी तीन-तीन पिढ्या काम केलेले आहे, त्यामुळे राजकरणापलीकडे जाऊन या कार्यकर्त्यांची कामे नियमित सुरू आहेत, यामुळे मी माढा लोकसभा मतदारसंघाच्या संघटक पदाचा पदभार घेणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Uddhav Thackeray-Dilip Sopal
भाजप मुख्यमंत्र्यांचा राजीनामा : राजीनाम्यानंतर म्हणाले, ‘बोलावणे आले तर दिल्लीला....’

शिवसेना पक्षप्रमुख उद्घव ठाकरे यांच्या आदेशानुसार माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे यांच्यावर सोलापूर लोकसभा मतदासंघ, तर साईनाथ अभंगराव यांच्यावर माढा लोकसभा मतदारसंघाच्या सहसंपर्कप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. दिलीप सोपल यांच्याकडे माढा लोकसभा, तर अजय दासरी यांच्याकडे सोलापूर मतदारसंघाचे संघटक पद देण्यात आले आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या समन्वयपदाची जबाबदारी माजी जिल्हाप्रमुख दीपक गायकवाड यांना देण्यात आली आहे. मात्र, सोपल यांनी मात्र पद स्वीकारण्यास नकार दिलेला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com