Solapur News: भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष देशमुख यांना अटकपूर्व जामीन मंजूर

Shrikant Deshmukh: जामीन मंजूर करताना तपासात पोलिसांना सहकार्य करण्याचे निर्देश देशमुख यांना देण्यात आले आहेत.
Shrikant Deshmukh
Shrikant DeshmukhSarkarnama

Sangola News: लग्न करतो म्हणून फसवणूक, तसेच बलात्कार प्रकरणात भारतीय जनता पक्षाचे सोलापूरचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख (Shrikant Deshmukh) यांना मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. तसेच, त्यांचा अर्ज कायमस्वरूपी निकाली काढला आहे. जामीन मंजूर करताना तपासात पोलिसांना सहकार्य करण्याचे निर्देश देशमुख यांना देण्यात आले आहेत. (Former BJP district president Deshmukh granted pre-arrest bail)

भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख हे एका महिलेसोबत बेडरुममध्ये आढळून आले होते. त्यानंतर त्यांची जिल्हाध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आली होती. संबंधित महिलेने देशमुख यांच्याविरोधात फसवणूक आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला हेाता. त्या प्रकरणी जामीन अर्ज मिळावा, यासाठी देशमुख यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

Shrikant Deshmukh
Ramesh Kadam News : रमेश कदम यांना आठ वर्षांनंतर जामीन मंजूर; पण मुक्काम जेलमध्ये राहणार...

अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायमूर्ती श्रीमती अनुजा प्रभू देसाई यांच्यापुढे सुनावणी झाली. न्यायमूर्तींनी देशमुख यांचा सदर प्रकरणात अटक पूर्व जामीन मंजूर करत कायमस्वरूपी अर्ज निकाली काढला. देशमुख यांच्या बाजूने वरिष्ठ विधीज्ञ शिरीष गुप्ते, आशिष गायकवाड, उज्वल अगंदसुर्वे यांनी बाजू मांडली.

उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर करतेवेळी आदेशात तक्रारकर्ता व अर्जदार यांचे एकमेकांचे २०१८ पासूनचे नातेसंबंध आणि जुनी मैत्री होती. त्याचबरोबर अर्जदार हे विवाहित होते, याची पूर्ण जाणीव तथा याची पूर्ण कल्पना तक्रारदार महिलेस पहिल्यापासून होती. तरी आपसातील प्रेमसंबंध परस्पर संमतीनेच ठेवले. तसेच तक्रार दाखल करेपर्यंत त्यांनी ठेवले होते. त्यामुळे अशा स्वरूपाच्या घटना हा बलात्कारासारखा गुन्हा केला, असे म्हणता येणार नाह, असे मत नोंदविले आहे. याबाबतची माहिती ॲड. आशिष गायकवाड यांनी दिली.

Shrikant Deshmukh
Supreme Court Hearing : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी चालली तब्बल १२ दिवस ४८ दिवस : या तारखेपर्यंत निकाल शक्य

जिल्हाध्यक्षपद सोडावे लागले हेाते.

श्रीकांत देशमुख यांनी लग्न करतो असे सांगून फसवणूक तसेच बलात्कार केल्याचा आरोप एका महिलेने केला होता. या प्रकरणावरून बरेच राजकीय वादंग निर्माण झाले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर देशमुख यांची भाजपच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला असल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com