Sangali Crime news: माजी नगरसवेकाची हत्या; भाजपचाच माजी नगरसेवकच निघाला हत्येचा सुत्रधार

सांगली (Sangali) जिल्ह्यातील जतमध्ये दोन-तीन दिवसांपूर्वी भाजपचे नगरसेवक विजय ताड यांची करण्यात आली
Sangali Crime news:
Sangali Crime news:Sarkarnama

Sangali Crime news:  सांगली (Sangali) जिल्ह्यातील जतमध्ये दोन-तीन दिवसांपूर्वी भाजपचे नगरसेवक विजय ताड यांची करण्यात आली. या हत्येप्रकरणी चौघांना कर्नाटकातील गोकाकमधून अटक करण्यात आली असून ताड यांच्या हत्येमागे भाजपच्याच माजी नगरसेवकाचा हात असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. (Former BJP corporator Umesh Sawant is the main mastermind behind Vijay Tad's murder )

या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी १७ मार्च रोजी विजय ताड यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.या हत्येमागे भाजपचेच माजी नगरसेवक उमेश सावंत हे मुख्य सूत्रधार असल्याचं पोलीस तपासात आढळून आले आहे. तसेच, या प्रकरणातील निकेश उर्फ दादा मदने, बबलू उर्फ संदीप शंकर चव्हाण, किरण विठ्ठल चव्हाण आणि आकाश व्हनखंडे यांना चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर माजी नगरसेवक उमेश सावंत हे फरार आहेत,अशी माहिती पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी दिली आहे.

Sangali Crime news:
Sangali Crime news: धक्कादायक! सांगलीत भाजप नगरसेवकाची गोळ्या झाडून हत्या..

१७ मार्चला नगरसेवक ताड हे आपल्या चारचाकी गाडीतून सांगोला रोडवरील अल्फान्सो स्कूल येथे आपल्या मुलांना शाळेतून आणण्यासाठी निघाले होते. स्कूलच्या जवळ पोहोचले असता काही अज्ञात हल्लेखोर त्यांचा पाठलाग करत तिथे पोहचले, त्यांनी ताड यांची इनोव्हा गाडी अडवली आणि त्यांच्या गाडीवर हल्ला करत ताड यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या.या हल्ल्या ते जागीच ठार झाले.

घटनेची माहिती मिळताच अधीक्षक बसवराज तेली यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन गतीने तपास सुरू केला. ताडं यांच्या हत्येमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. यापप्रकरणी सांगली पोलीसांनी चार पथकांच्या माध्यमातून या प्रकरणाचा तपास सुरु केला. तपासादरम्यान पाच जणांची नावे पुढे आली. यात मुख्य सूत्रधार हा भाजपच्या माजी नगरसेवक उमेश सावंत असल्याचं आढळून आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com