Patan : वनक्षेत्रपालांच्या बदलीसाठी वन कर्मचारी आक्रमक; पालकमंत्र्यांना दिले निवेदन

Forest officer गरज नसताना कामे प्रलंबित आहेत, असे सांगून वारंवार पाटण येथे मिटिंग लावणे, तसेच लाकूड व्यापारी याकडून व इतर कारनामा मधील पैसे गोळा करून द्या, अशी धमकी देत आहेत.
Maharashtra Forest Department
Maharashtra Forest Departmentsarkarnama

-यशवंतदत्त बेंद्रे

Patan News : पाटण Patan तालुक्याचे वनक्षेत्रपाल Forest ranger एल. व्ही. पोतदार यांचा मनमानी, अन्यायकारक, जाचक कारभाराची सखोल चौकशी करुन त्यांची ताबोडतोब तालुक्याबाहेर बदली करावी. अथवा, तालुक्यातील सर्व वन कर्मचाऱ्यांची तरी बदली करा, असा आक्रमक पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. याबाबत न्याय न मिळाल्यास सर्व कर्मचारी सामूहिक रजेवर जातील, असा गंभीर इशारा पाटण वनपरिक्षेत्रातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी निवेदनाव्दारे दिला आहे.

वन कर्मचाऱ्यांनी निवेदनात म्हटले की, पाटण तालुका वनक्षेत्रपाल म्हणून एल. व्ही. पोतदार ऑगस्ट 2021 मध्ये रुजू झाले. त्यापासून क्षेत्रीय कर्मचारी आणि कार्यालयीन कर्मचारी विश्वासात न घेता हुकुमशहा प्रमाणे कार्यालयीन आणि क्षेत्रीय कामात स्वतःच निर्णय घेत आहेत. कार्यालयात कमी व स्वतः च्या शासकीय निवासस्थानी जास्त असतात. वनविभागाच्या वर्दीशिवाय अर्ध नग्न कपडे घालून कार्यालयीन कामकाज पाहतात.

या वागणुकीमुळे लोकांमध्ये हसे होत आहे. वरिष्ठ अधिकऱ्यांच्या नावाचा सतत वापर करुन कर्मचारी वर्गाला दहशतीखाली ठेवत आहेत. रुजू झाल्यापासून कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर मिळत नाही. शासनाच्या अन्य योजनांचा लाभ कर्मचाऱ्यांना मिळत नाही. गरज नसताना कामे प्रलंबित आहेत, असे सांगून वारंवार पाटण येथे मिटिंग लावणे, तसेच लाकूड व्यापारी याकडून व इतर कारनामा मधील पैसे गोळा करून द्या, अशी धमकी देत आहेत.

Maharashtra Forest Department
Patan News: पाटणला मोर्चात पोलिस, आंदोलकांत झटापट; पाटणकरांचे पालकमंत्र्यांवर आरोप

श्री. पोतदार आणि रेंज कार्यालयीन कर्मचारी यांच्यात कोणताही सन्मवय नसल्यामुळे आम्ही वेळेत माहिती देऊनही वरिष्ठ कार्यालयकडे माहिती पोहोचत नाही. याचा ठपका आमच्यावर ठेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावे धमकाऊन आम्हाला दहशतीखाली ठेवतात. प्रत्येक कामात आडमुठया भूमिकेमुळे वनपरिक्षेत्रात काम करणे अवघड बनले आहे.

Maharashtra Forest Department
Satara News: कास परिसरातील १५५ बांधकामे अधिकृत करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

त्यामुळे आम्हा सर्व कर्मचाऱ्यांची तालुक्याबाहेर बदली करा. अन्यथा वनक्षेत्रपाल पोतदार यांची तात्काळ बदली करा. नाहीतर आम्ही सर्व कर्मचारी सामूहिक रजेवर जाऊ असा इशारा निवेदनाव्दारे दिला आहे. या निवेदनावर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या सह्या आहेत. तसेच हे निवेदन पालकमंत्री शंभूराज देसाई, उपवनसंरक्षक(सातारा), सह. वनसंरक्षक, महाराष्ट्र वनरक्षक-वनपाल संघटना नागपूर यांना देण्यात आले आहे.

Maharashtra Forest Department
Mungantiwar : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्याची पुन्हा जागतिक स्तरावर दखल...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in