यासाठी मंत्री छगन भुजबळ आदित्य ठाकरेंशी बोलणार...

नायगाव Naigaon येथे मुलींच्या एन.डी.ए.स्पर्धा परिक्षा NDA Exam तयारीसह केंद्र व राज्य लोकसेवा आयोग MPSC, UPSC, इतर प्रशिक्षणासाठी शासनाकडे सादर केलेल्या 50 कोटी रुपयांचा आराखड्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे मंञी छगन भुजबळ Chhagan Bhujbal यांनी सांगितले.
Aditya Thackeray, Chhagan Bhujbal

Aditya Thackeray, Chhagan Bhujbal

sarkarnama

खंडाळा : नायगाव येथील सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकास ब वर्ग पर्यटन दर्जा देण्यात आला आहे. यामुळे येथील पाच कोटी रुपये खर्च करुन बांधलेल्या रिसॉर्टची सध्या दुर्दशा झाली आहे.यामुळे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी बोलुन ही इमारत महात्मा फुले प्रशिक्षण संस्था (महाज्योती) कडे वळविणार आहे. याप्रमाणे कटगुण (जि.सातारा) प्रमाणे फुले दांपत्यांनी कार्य केलेल्या पवित्र ठिकाणी व इतर ठिकाणी ही महाज्योतीने राज्यभर असे स्पर्धात्मक परिक्षा तयारीसाठी प्रशिक्षण केंद्र उभारुन त्यातून नवीन प्रशासकीय अधिकारी निर्माण करावेत. यासाठी लागणारी सर्व मदत करु, असे आवाहन अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

महाज्योतीच्यावतीने नायगाव येथे उभारलेल्या कार्यालयाच्या पहाणीप्रसंगी मंत्री भुजबळ बोलत होते. यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, संचालक दिवाकर गमे, प्रा. हरी नरके, समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापुसाहेब भुजबळ, जिल्हाध्यक्ष राजेंद्र नेवसे, प्रदेश प्रवक्ते दशरथ ननावरे, शिवसेना तालुकाप्रमुख आदेश जमदाडे उपस्थित होते.

<div class="paragraphs"><p>Aditya Thackeray, Chhagan Bhujbal</p></div>
संजय राऊत म्हणाले, तर छगन भुजबळ मंत्री म्हणून दिसले नसते!

फुले दांपत्यांनी शिक्षण देऊनच सामाजिक परिवर्तन घडु शकते, हे ओळखुन शाळा सुरु केल्या, असे सांगून श्री. भुजबळ म्हणाले, याप्रमाणे आजच्या नव्या पिढीला स्पर्धा परिक्षांचे महत्व पटवुन देऊन, प्रशासकीय अधिकारी बनवुन आयुष्य घडवावे लागणार आहे. यासाठी महाज्योतीने आपल्या संस्थेमार्फत संपूर्ण राज्यभर असे प्रशिक्षण केंद्र उभारावे. कटगुण येथे ही चार एकर जागा शिल्लक असल्याने येथे नायगांवप्रमाणेच आराखडा बनवावा.

<div class="paragraphs"><p>Aditya Thackeray, Chhagan Bhujbal</p></div>
मार्चपर्यंत इंपेरिकल डेटा मिळण्यासाठी आग्रही : अजित पवार

तसेच नायगाव येथे मुलींच्या एन.डी.ए.स्पर्धा परिक्षा तयारीसह केंद्र व राज्य लोकसेवा आयोग, इतर प्रशिक्षणासाठी शासनाकडे सादर केलेल्या 50 कोटी रुपयांचा आराखड्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे मंञी भुजबळ यांनी सांगितले. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हर्णे यांची याबाबत प्रत्यक्ष भेट घेऊन विनंती केले असता महाज्योतीकडे या इमारतीचा ताबा देण्याबाबत लवकर कारवाई करु, असे आश्वासन त्यांनी दिले. यामुळे या प्रशिक्षण केंद्रास लवकरच गती मिळेल, असे महाज्योतीचे दिवाकर गमे यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com