
-हेमंत पवार
Karad Maratha Protest : मराठा समाजास ५० टक्केच्या आत ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी कराडला उद्यापासून (ता. १३) २०० दिवस चक्री उपोषण मराठा क्रांती मोर्चाने पुकारले होते. मात्र, पुसेसावळीतील घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू असल्याने तसेच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उद्यापासून सुरु होणारे चक्री उपोषण आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.
मराठा समाजाला Maratha Reservation गेली अनेक वर्षे आरक्षणाभोवती झुलवत ठेवले असून समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या Marath Kranti Morcha माध्यमातून यापूर्वी अनेक मोर्चे शांततेने झाले. राज्यातील प्रत्येक जातीची लोकसंख्या तपासुन त्या जातीला आरक्षण दिले पाहिजे. सध्या काही जातींना दिलेले आरक्षण हे फुगीर आरक्षण असल्याचे दिसत आहे. त्यामुळे एकदा सर्वच आरक्षणाच्या लोकसंख्येची शहानिशा करणे गरजेचे आहे.
त्यातुन मराठा समाजाला ५० टक्क्यांच्या आत ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देता येते हे सांगण्याची वेळ आली आहे. आम्ही ते कसे देता येईल दाखवुन देवू. आमची लढाई प्रशासनाची, पोलिसांबरोबर नाही. आमची लढाई ही हक्काची असून शासनाशी आहे. जालना जिल्ह्यातही आंदोलन सुरु असताना तेथे पोलिसांकडून लाठीहल्ला करण्यात आला. मात्र तरीही मनोज जरांगे यांनी आंदोलन मागे घेतले नाही.
त्यांनी सर्व मराठा समाजाला कुणबी दाखले द्यावे अशी मागणी केली आहे. राज्यातील सर्व मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही मागणी असुन त्यासाठी उद्यापासुन कऱ्हाड तालुका मराठा मोर्चाच्यावतीने चक्री उपोषण येथे सुरु करण्यात येणार होते. त्यामध्ये तालुक्यातील २०० गावातील लोक सहभागी होणार होती.
मात्र पुसेसावळीतील घटनेच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात प्रशासनाने जमावबंदीचे कलम लागू केले आहे. त्याचबरोबर काही दिवसावरच गणेशोत्सव आला आहे. समाजातील तरुणांनाही त्यांच्या-त्यांच्या मंडळासाठी वेळ द्यावा लागणारा आहे.
याचा विचार करुन समाजाच्या समन्वयकांची आज पोलिस उपाधिक्षक ठाकुर, तासगावचे पोलिस उपाधिक्षक सचिन थोरबोले, वरिष्ठ शहर पोलिस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी यांच्यासोबत बैठक झाली. त्यानंतर उद्यापासुन सुरु होणारे मराठा समाजाचे चक्री उपोषण आंदोलन तात्पुरते स्थगीत करुन पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Edited By Umesh Bambare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.