या कारणांसाठी सभापती रामराजेंनी मानले शिवेंद्रसिंहराजेंचे आभार...

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले Shivendraraje Bhosale यांनी दुसऱ्यांदा अध्यक्षपदावर संधी देण्याची मागणी केली होती. त्यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar यांची भेट घेऊन याबाबतची मागणी केली होती.
Shivendraraje Bhosale, Nitin Patil, Ramraje Nimbalkar
Shivendraraje Bhosale, Nitin Patil, Ramraje Nimbalkarsarkarnama

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडी आज सर्वानुमते बिनविरोध झाल्या. अध्यक्षपदी नितीन पाटील तर उपाध्यक्षपदी अनिल देसाई यांची निवड करण्यात आली. या निवडीनंतर बोलताना विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी साताऱ्याचे भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आभार मानले. शिवेंद्रसिंहराजेंनी मनाचा मोठेपणा दाखवून हे सर्व घडवून आणले, असे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हा बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडी आज झाल्या. अध्यक्षपदासाठी इच्छुकांची संख्या जास्त होती, त्यापेक्षा विद्यमान अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दुसऱ्यांदा संधी देण्याची मागणी केली होती. त्यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन याबाबतची मागणी केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचे संचालक नितीन पाटील यांनीही अध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याचे सहकार व पालकमंत्री बाळासाहेब पाटील व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना सांगितले होते.

Shivendraraje Bhosale, Nitin Patil, Ramraje Nimbalkar
कालपर्यंत शिवेंद्रसिंहराजेंची चर्चा, आज अध्यक्षपदी नितीन पाटील बिनविरोध...

तसेच राजेंद्र राजपुरे, सत्यजित पाटणकर यांचीही नावे इच्छुकांत होती. पण, खरी चुरस नितीन पाटील व शिवेंद्रसिंहराजे यांच्यातच होती. पण, याचा दरम्यान, राष्ट्रवादीच्या संचालकांनी व पदाधिकाऱ्यांनी जिल्हा बँकेचा अध्यक्ष राष्ट्रवादीचाच झाला पाहिजे, अशी अटकळ बांधली. यासाठी काहींनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार शरद पवार यांच्यापर्यंत ही मागणी पोचवली होती. त्यामुळे खासदार शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार कोणाचे नाव निश्चित करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

Shivendraraje Bhosale, Nitin Patil, Ramraje Nimbalkar
उदयनराजे, शिवेंद्रराजेंना जमले, ते सहकारमंत्री, शशिकांत शिंदेंना का जमले नाही...

पण, रात्री बारा वाजता पवार साहेबांचा सभापती रामराजेंना फोन आला व त्यांनी आगामी काळात पक्ष वाढीसाठी राष्ट्रवादीचाच संचालक बँकेवर गरजेचा आहे, असा मुद्दा मांडला. त्यानुसार नितीन पाटील यांचे नाव निश्चित करण्यात आले. तर शिवेंद्रसिंहराजेंनी सातारा तालुक्यातून सर्वाधिक मते राष्ट्रवादीच्या सहकार पॅनेलच्या उमेदवारांना दिल्याने त्यांचाही मान राखण्यासाठी त्यांच्या कोट्यातून अनिल देसाई यांना उपाध्यक्ष पद देण्यात आले. त्यामुळे पदाधिकारी निवडी या नेहमीप्रमाणे बिनविरोध झाल्या.

Shivendraraje Bhosale, Nitin Patil, Ramraje Nimbalkar
सातारा जिल्हा बँक नाबार्डच्या 'उत्कृष्ट कार्यक्षमता' पुरस्काराने सन्मानित

या निवडीनंतर सभापती रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, बँकेच्या प्रथे प्रमाणे निवडणूक पार पाडली आहे. तसेच पदाधिकारी निवडही बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे पॅनेलचे सर्व विषय आता संपले आहेत. सातारा जिल्हा बँक देशात एक नंबरची बँक झालेली आहे. अजून पुढे आंतरराष्ट्रीय पातळीवर ही बँक कशी नेता येईल, यासाठी आमचा प्रयत्न राहिल. जगात रोबो बँक नावाची सहकारी बँक आहे. ती आंतरराष्ट्रीय पातळीवरून आपल्या देशात आलेली आहे.

Shivendraraje Bhosale, Nitin Patil, Ramraje Nimbalkar
कोरेगाव, माणच्या पराभवावर शरद पवार, अजित दादांनीही व्यक्त केली खंत...

या बँकेबरोबर आपल्या जिल्हा बँकेची तुलना व्हावी, त्या पध्दतीचे कामकाज आपल्या बँकेत चालावे. त्यासाठी सर्व सहकारी संचालकांचे जे आमच्या सहकार पॅनेलच्या बाहेरून व आतून निवडून आलेले आहेत. त्यासाठी बरेच काही घडून गेलेले आहे. त्याविषयाकडे मी आता जात नाही. या सर्व संचालकांचे सहकार्य लाभणे गरजेचे आहे. या सर्वांना घेऊन एकत्रितपणे बँकेची वाटचाल करण्याचा आमचा प्रयत्न राहिल. शिवेंद्रसिंहराजेंचे मी आभार मानतो. कारण त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून हे सर्व घडवून आणले. त्यामुळे बँक निश्चितपणे चांगल्या प्रकारे चालेल, याची ग्वाही मी साताऱ्यातील जनतेला देतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in